Heat Wave  Agrowon
ॲग्रो विशेष

Amaravati Heatwave : उष्माघाताचा धोका वाढतोय! अमरावतीत ५९ केंद्रांवर उपचार कक्ष सज्ज

Heatstroke Ward In Hospital : जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मृत्यूचीही शक्यता वाढते. जिल्ह्यात कमाल तापमान वाढत चालले असून पारा ३९ अंशांवर पोहोचला आहे.

Team Agrowon

Amaravati News : जिल्ह्यात पुढील तीन महिने तापमानाचा पारा ४४ अशांच्या घरात राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी जिल्ह्यातील सर्व ५९ प्राथमिक आरोग्यकेंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन करून तेथे पुरेसा औषधसाठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने प्रत्येक पीएचसीत उष्माघात कक्ष सज्ज केला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मृत्यूचीही शक्यता वाढते. जिल्ह्यात कमाल तापमान वाढत चालले असून पारा ३९ अंशांवर पोहोचला आहे.

उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उन्हापासून असा करा बचाव

दर तासाला १ ते १.५ ग्लास पाणी घ्यावे. निंबू सबरत, फळांचा ताजा रस, पन्हे, कोकम सरबत, ताक, लस्सी असे द्रवपदार्थ घ्यावेत. आराम करावा, सैलसर, पातळ, फिक्कट रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

उष्माघात टाळण्यास हे करा

गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरू नये. बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री अथवा सनकोट सोबत हवा. जर बाहेर जावे लागलेच तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा निदानासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. लहान मुले व ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT