Summer Heat Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Heat : तापमानाचा पारा ४२ अंशांवर; खानदेशात उष्णता वाढतीच

Weather Update : खानदेशात कमाल तापमान सलग दोन दिवस ४२ अंश सेल्सिअसवर राहिले आहे. यामुळे केळी व अन्य फळबागांना फटका बसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कमाल तापमान सलग दोन दिवस ४२ अंश सेल्सिअसवर राहिले आहे. यामुळे केळी व अन्य फळबागांना फटका बसत आहे. उत्पादनासही यामुळे फटका बसेल, असे दिसत आहे. तापमानात मागील पाच - सहा दिवसांत मोठी वाढ झाली आहे.

२२ मार्चपर्यंत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. परंतु सहा ते सात दिवसांत तापमान सतत वाढले असून, पारा आता ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. तापमानात काही दिवसांत मोठी वाढ झाल्याने पिकांना फटका बसत आहे. शेतीकामे रखडत सुरू आहेत.

ग्रामीण भागात नागरिक दाट झाडांच्या सावलीत दुपारच्या वेळी बसलेले दिसतात. लोकसभा निवडणुकीचे वातावरण एकीकडे तापत असताना दुसरीकडे तापमानाचा उच्चांकही वाढत आहे. मार्चअखेरच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरवात केली आहे. मागील वर्षी मार्चअखेरपर्यंत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंतच होते. परंतु यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे.

केळी, पपई, कलिंगड, खरबूज व अन्य पिकांचे सिंचन करण्यासंबंधी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. रोज पिकांना दोन ते अडीच तास पाणी द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस शेतात थांबून सिंचन करून घेतले जात आहे. दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढते. ती सायंकाळी पाचपर्यंत कायम असते.

यामुळे अनेकांनी दुपारनंतर उन्हात जाऊन कामे करण्याचे टाळले आहे. जी कामे आहेत ती दुपारी बाराच्या आत करून दुपारी उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत. जळगावसह धुळे व नंदुरबारातही तापमान अधिक आहे. धुळ्यातील कोरडवाहू पट्ट्यात उष्ण झळा अधिक बसत आहेत. नंदुरबारातही खडकाळ, मुरमाड क्षेत्रात उष्णता वाढली आहे.

उष्णाघात कक्षांची गरज

ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्षांची गरज आहे. कारण उष्णता वाढलेली असतानाच लग्नसराई व शेतीकामेही सुरू आहेत. उष्णतेत अपघात किंवा उष्मघातासंबंधीची समस्या तयार होऊ शकते. यामुळे ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधसाठा, उष्माघात कक्ष व कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आवश्यक आहे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT