Heat Wave  Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : पालघर जिल्ह्याला उष्णतेचा तीव्र तडाखा बसणार

Summer Heat : भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांच्या कालावधीत कोकण विभागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन-चार अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Palghar News : भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांच्या कालावधीत कोकण विभागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन-चार अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे.

कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

तसेच २६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यासाठी उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. उष्णतेत वाढ व आर्द्रतेत घट होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाच्या सूचना

अशक्तपणा, डोकेदुखी, स्थूलपणा, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे.

रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच वेळोवेळी अंघोळ करावी.

कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येऊ नये.

शेतीचे नियोजन असे करा

फळबाग, भाजीपाला आणि फुलपिकांना गरजेनुसार पाणी द्यावे.

पाणी देण्याची वेळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळी निवडावी.

झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन

कमी होईल.

नवीन लागवड केलेल्या रोपांना सावली देऊन त्यांचे संरक्षण करावे.

पाण्याची कमतरता असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.

आंबा, केळी, पपईसारख्या फळांना पिशवीने झाकून उन्हापासून बचाव करावा, असा सल्ला वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी

जनावरांना ताजे, स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

दुपारी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील.

शेडच्या छतावर वाळलेले गवत टाकावे, जेणेकरून उष्णतेपासून संरक्षण होईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास जाधव यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?

Bihar Election 2025: संकेत आणि संदेश

Interview with Dr Subhas Puri: कृषी विद्यापीठांमध्ये आमूलाग्र बदलांची आवश्यकता

Digital Literacy: यू-ट्यूबर विरुद्ध अंतराळवीर : बदललेली स्वप्ने

Lemon Disease: लिंबूवर्गीय पिकावरील सिट्रस कॅंकर

SCROLL FOR NEXT