Summer Weather
Summer WeatherAgrowon

Heat Wave: सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; राज्यातील कमाल तापमानाचा पारा पोचला ३८ अंशाच्या पार

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, हवामान विभागाने सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. काही भागांत तापमान ३८ अंशांच्या पार गेले असून, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published on

Pune News:उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील काही भागात तापमान आता ३८ अंशाच्या पार गेले. दुपारी उन्हामुळे चांगलाच घामटा निघत आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

Summer Weather
Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण लाटेचा इशारा; रत्नागिरी येथे ३८.९ अंश तापमानाची नोंद

राज्यातील वाढलेले तापमान कायम असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. उद्या ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात तर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

Summer Weather
Weather Update: उन्हाचा चटका होतोय असह्य; राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानात आजही वाढ

कोकणातील काही भागात तापमान चांगलेच वाढले आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील सर्वाधिक ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. डहाणू येथेही ३८.१ अंश सेल्सिअस तापमान होते. तर राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. पालघर, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी येथे ३६ अंशापेक्षा जास्त तापमान होते. राज्यातील कमाल तापमान बहुतांशी भागात वाढले आहे.

देशातील सर्वाधिक तापमान केरळमधील कन्नूर येथे नोंदले गेले. कन्नूर येथे ३९ अंश सल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर सर्वात कमी तापमान अयोध्येत होते. उत्तर प्रदेशातील अयोध्येत सर्वात कमी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. म्हणजेच देशातील निचांकी तापमानातही वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com