Tanaji Sawant Agrowon
ॲग्रो विशेष

Tanaji Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याला अपघात; स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी

Tanaji Sawant Car Accident : आरोग्य मंत्री तानाजी सावंत कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातात त्याचा स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाला आहे. तर दुर्दैवाची बाब म्हणजे आरोग्य मंत्री असणाऱ्या सावंत यांच्या ताफ्यातच रुग्णवाहिका नसल्याचे समोर आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Kolhapur News : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात कोल्हापूर येथे रविवार (२४ रोजी) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झालेली नसून त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत.

याबात मिळालेली माहिती अशी की, मंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. ते एका कार्यक्रमासाठी भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये येत अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन ते जोतिबा दर्शनासाठी निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.

हा अपघात कोल्हापूर-रत्नागिरी माहामार्गावर रजपूतवाडी जवळ झाला. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच या अघतात सुदैवाने कोणतीच जिवतहाणी झाली नाही. मात्र त्यांते स्वीय सहाय्यक रविराज जाधव किरकोळ जखमी झाले. सावंत हे सुखरूप असून ते दुसऱ्या सरकारी वाहनाने जोतिबा दर्शनासाठी पुढे गेले आहेत. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दोन गाड्या एकमेकाला धडकल्या

कोल्हापूर-रत्नागिरी माहामार्ग हा रुंदीस लहान असल्याने येथे रहदारी प्रचंड आहे. दरम्यान सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. हा अपघात दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

आरोग्य मंत्र्यांनाच रुग्णवाहिका नाही

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला अपघात झाल्याचे उघड झाले आहे. यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी मात्र आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात रुग्णवाहिका नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT