Tuti Fruit  Agrowon
ॲग्रो विशेष

Tuti Fruit : तुती फळाचे आरोग्यदायी फायदे

Mulberry Fruit : तुती फळांबाबत आपल्यापैकी अनेकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि फायदे याविषयी माहिती असणे आवश्यक आहे

Team Agrowon

कृष्णा काळे, वैष्णवी पुंड

Mulberry : तुती फळांबाबत आपल्यापैकी अनेकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि फायदे याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तुती फळे ही दिसायला ब्लॅकबेरीसारखी असतात. आणि चवीला द्राक्षाप्रमाणे लागतात. या फळांमध्ये विविध पोषक घटक आणि जीवनसत्त्वे असतात. कच्च्या तुती फळांमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज असतात. तुतीमधील कर्बोदके साखरेचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करतात. त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते. तुतीचे सेवन केल्याने लोहाचे प्रमाण वाढते.

आरोग्यदायी फायदे ः
पचनक्रिया सुधारते ः

तुतीमध्ये तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते. तुती फळांच्या सेवनामुळे अन्न पचनाची प्रक्रिया सुलभ होऊन बद्धकोष्ठता, पोट फुगी आणि पोटात पेटके या सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते ः
पांढऱ्या रंगाच्या तुतीमध्ये असलेली काही रसायने टाइप-२ मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसारखी असतात.

कर्करोगाचा धोका कमी होतो ः
तुतीमध्ये ॲन्थोसायनिन्स नावाचे घटक असतात. हे घटक कर्करोगाच्या पेशींना दूर ठेवतात. तुतीमधील रेझवेराट्रॉल नावाचे घटकांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे कोलन कर्करोग, त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि थायरॉईडशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करते.

रक्ताभिसरण सुधारते ः
- तुतीमध्ये भरपूर प्रमाणात ॲन्टिऑक्सिडंट असतात. हे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतात. यामुळे हृदयापासून शरीराच्या इतर भागांमध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- तुतीमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. लोहाची उपस्थिती लाल रक्तपेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देते.
- तुतीमध्ये असलेले पॉलिफेनॉल रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात.

प्रतिकारशक्ती सुधारते ः
- तुती मॅक्रोफेजेसमध्ये असलेल्या अल्कलॉइड्सचा वापर त्यांना सक्रिय करण्यासाठी होतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

हाडांची ऊती तयार करते
जीवनसत्त्व क, कॅल्शिअम आणि लोह यांचे मिश्रण हाडांमधील ऊती आणि हाडे मजबूत करण्यास पोषक तत्त्वांचे सर्वोत्तम संयोजन आहे. यामुळे हाडांच्या संबंधित आजार टाळण्यास मदत होते.

यकृतासाठी फायदेशीर ः
तुतीमध्ये यकृत मजबूत करण्याची क्षमता असते. त्यामुळे यकृताचे आरोग्य उत्तम राखले जाते. यकृतातील रक्त पोषण आणि शुद्ध करतात.

फ्लू आणि सर्दी प्रतिबंधित करते ः
सतत फ्लूचा त्रास होत असेल तर तुती खाणे फायदेशीर ठरते. पांढरी तुती ही फ्लू आणि सर्दीपासून बचाव करण्यास मदत करतात. सर्दी आणि फ्लूचा त्रास सतत जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

विरोधी दाहक गुणधर्म ः
तुतीमध्ये रेझवेराट्रोल नावाचे दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामध्ये असलेले ॲन्थोसायनिन्स नावाचे घटक जळजळ कमी करण्यास मदत करतात.
------------------
- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६
(एम.टेक., फूड टेक्नॉलॉजी, कार्यकारी व्यावसायिक अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

Costal Safety : काशीदला ‘बंधाऱ्या’चे सुरक्षा कवच

Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

Dhamani Dam : धामणी धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा

Loan Waiver Promise: अजितदादांच्या सासुरवाडीतूनच कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT