Team Agrowon
ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वनस्पती असून, ती वेगवेगळ्या हवामानामध्ये येते.
या फळामध्ये मलईदार गर असून, त्याला विशिष्ट असा सुगंध असतो. फळ कापल्यानंतर गर सहजतेने काढता येतो.
भारतीय ग्राहकांची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या फळांची आयात होत असे. मात्र, अलीकडे या फळाची लागवडही वाढू लागली आहे.
गरामध्ये असलेल्या काळ्या छोट्या बियांमुळे खाताना त्याचा पोत एकाच वेळी मलईदार आणि कुरकुरीत लागतो.
गर कच्चा खाताना किचिंत गोड लागतो. त्याला कॅलरीचे प्रमाण कमी आहे. त्यातील बिया खाता येतात
फळांना ताज्या स्वरूपामध्ये मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्रूट पासून बनविलेल्या मूल्यवर्धित पदार्थांनाही वाव आहे.