Betel Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Leaf Benefits: विड्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

Natural Health Benefits: विड्याचे पान हे सर्दी, खोकला आणि कफ यावर खूपच गुणकारी आहे.पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, अस्थमा यांसारख्या आजारांच्या उपचारासाठी होतो.

Team Agrowon

रेणुका मिसाळ, डॉ. के. एस. गाढे 

Betel Leaf Ayurvedic Herb: विड्याचे पान हे सर्दी, खोकला आणि कफ यावर खूपच गुणकारी आहे.पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, अस्थमा यांसारख्या आजारांच्या उपचारासाठी होतो.  सर्दी झाली असेल तर विड्याचे पान मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरते.

विड्याच्या पानामध्ये बाष्पशील तेलांसोबतच अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट आणि अनेक प्रकारची जीवनसत्वे असतात. विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे आहेत. ज्या लोकांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांनी विड्याचे पान खाणे खूपच फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरीसोबत पानाचे सेवन केल्यास व्यवस्थित भूक लागते.

विड्याचे पान मधुमेहावर गुणकारी आहे. पाने वाटून त्याचा रस कपाळावर लावल्यास काही मिनिटांमध्ये डोकेदुखी दूर होते. विड्याच्या पानाचा रस जखमेवर लावला आणि त्यावर पट्टी बांधून ठेवली तर तुमची जखम दोन दिवसांत भरते. विड्याचे पान थोडेसे गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून ते फोड आलेल्या ठिकाणा लावल्यास आराम मिळतो.

विड्याचे पान हे सर्दी, खोकला आणि कफ यावर खूपच गुणकारी आहे. पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, अस्थमा यांसारख्या आजारांच्या उपचारावर होतो. सर्दी झाली असेल तर विड्याचे पान मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरते.पानाचा वापर हा चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग किंवा मुरुमांवर उपाय म्हणून केला जातो. 

पानाचे सेवन केल्याने आवाज स्वच्छ आणि पातळ होतो. विड्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास गळ्याशी संबंधित समस्या दूर होतात.विड्याची पान चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होते, दातही चांगले राहतात. हिरड्या मजबूत राहतात.विड्याचे पान हे थंड आहे. त्यामुळे विड्याच्या पानांचा रस प्यायल्याने गॅस्ट्रीक अल्सर होत नाही.  

पानांमधील घटक तोंडाची दुर्गंधी दूर करतात.विड्याचे पान चावून खाल्ल्यास पचन तंत्र सुधारते. जेव्हा आपण विड्याचे पान चावून खातो तेव्हा आपल्या लाळ ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो. जो आपल्या पचनतंत्रासाठी खूप आवश्यक असतो. 

विड्याचे पान चावून खाल्ल्यास तोंडाच्या कर्करोगापासून सुटका होते. विड्याच्या पानात जास्त प्रमाणात ॲस्कॉर्बिक अॅसिड असते, जे एक चांगलं अँटी ऑक्सीडंट आहे. हे शरीरातील फ्री रॅडीकल कमी करतं.

विड्याच्या पानांच्या सेवनाने वजन संतुलित राहतं आणि मेटाबॉलिजमसुद्धा चांगले राहते. ज्यामुळे शरीरात एक्स्ट्रा फॅट्स जमा होत नाही. आयुर्वेदानुसार विड्याच्या पान शरीरातील मेद धातू म्हणजेच बॉडी फॅट काढण्याचे काम करते. ज्यामुळे आपले वजन कमी राहते. जर तुम्ही काळ्या मिरीसोबत रोज विड्याच्या पानाचे सेवन केले, तर आठ आठवड्यांत तुमचे वजन कमी होईल.

झोपण्याआधी विड्याचे पान मीठ आणि ओव्यासकट चावून खाल्यास चांगली झोप लागते.तोंड आल्यास विड्याचे पान पाण्यात उकळून घ्यावे. या पाण्याने चूळ भरावी म्हणजे त्रास कमी होईल. अंगाला खाज सुटत असेल तर विड्याची पाने पाण्यात उकळून घ्यावीत. त्या पाण्याने अंघोळ करावी.डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लालसर दिसत असल्यास विड्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करावे आणि त्या पाण्याने डोळे धुवावेत.

शरीरावर एखाद्या ठिकाणी भाजल्यास विड्याची पानाची पेस्ट बनवून लावा. काही वेळाने पेस्ट धुवून टाकावी आणि त्यावर मध लावावा. त्या जागी जळजळ होणार नाही, डागही दिसणार नाही.उन्हाळ्यात नाकाचा घोणा फुटण्याचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी विड्याची पाने कुस्करून त्याचा वास घ्यावा. त्यामुळे लगेच फरक पडेल.जर थकल्यासारखे वाटत असेल तर विड्याच्या पानाच्या रसात मध मिसळून घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळेल.

संपर्क : रेणुका मिसाळ, ८५३०५७५२०४

(अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT