sandeep Shirguppe
जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची पद्धत भारतीय जीवनशैलीमध्ये पूर्वापार सुरू आहे.
जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात.
विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांमध्ये उपयोगी आहे.
ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विड्याची पाने चघळल्यास घसा साफ होतो.
विड्याची पाने देठासकट खावीत. याने पोट साफ होते.
विड्याच्या पानामध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने पिंपल्स दूर होण्यास मदत होते.
विड्याच्या पानांचा फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा तजेलदार बनेल.