Nuksan Madat Agrowon
ॲग्रो विशेष

Ativrushti Madat Status : अतिवृष्टीच्या अनुदानाची स्थिती मोबाईलवरून कशी चेक करावी?

Crop Loss Grant : संकेतस्थळावर अनुदानाची रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली. परंतु आता मात्र या संकेतस्थळावर अनुदान केवायसी केलेली शेतकरी पावतीवरील विशिष्ट क्रमांक वापरुन अनुदानाचा तपशील तपासू शकतात.

Dhananjay Sanap

Heavy rain : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टीचं अनुदान जमा करण्यास सुरूवात केली आहे. जून ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यात अतिवृष्टीने शेती पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक वेळ निविष्ठा मदत म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

अतिवृष्टीच्या अनुदानाचे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच mh.disatermangement.mahait.org या संकेतस्थळावर अनुदानाची रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली. परंतु आता मात्र या संकेतस्थळावर अनुदान केवायसी केलेली शेतकरी पावतीवरील विशिष्ट क्रमांक वापरुन अनुदानाचा तपशील तपासू शकतात.

अनुदानाचा तपशील तपासणी कशी करावी?

अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी सर्वात आधी ई केवायसीची पावती मिळवावी. त्यानंतर गुगलवर जाऊन https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus सर्च करावं. सर्च केल्यानंतर व्हिके नंबरसमोरील रकाण्यात पावतीवरील व्हिके म्हणजेच विशिष्ट क्रमांक टाकावा. त्यानंतर लाल रंगाच्या रकाण्यातील सबमीट (Submit) पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर स्टेट्सचा पर्याय स्क्रीनवर दिसतो. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाचा तपशील पाहता येतो.

स्टेट्समध्ये कोणता तपशील असतो?

पेमेंट स्टेट्समध्ये शेतकऱ्यांचा व्हिके नंबर, शेतकऱ्याचं नाव, बँक खाते क्रमांक, अनुदान जमा झाल्याची तारीख दिलेली असते. तसेच बँकेचं नाव, बँक खात्यावर जमा झालेली रक्कम, आणि रिमार्क दिलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदानाचा सर्व तपशील पाहता येतो.

लक्षात ठेवा, ई-केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असेल तरच ही माहिती पाहता येऊ शकते. तसेच या संकेतस्थळावर व्हिके नंबर टाकताना काळजीपूर्वक टाकावा. अन्यथा पेमेंट स्टेट्स पाहण्यास अडचणी निर्माण होतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक

Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव

Agri Department Tranfers Delay: आकृतिबंधाच्या आडून बदल्यांना खो; पात्रता, निकडीची कारणे असूनही कृषी विभागाकडून अडवणूक

Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा

Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली

SCROLL FOR NEXT