Haryana CM Nayab Singh Saini Agrowon
ॲग्रो विशेष

Purchase of Ten Crops on MSP : एमएसपीवर दहा पिके खरेदी करण्याबरोबरच कॅनोलच्या पाण्याचे शुल्कही माफ, मुख्यमंत्री सैनी यांची घोषणा

Haryana CM Nayab Singh Saini : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी कुरूक्षेत्र शंखनाद रॅलीत दहा पिके हमीभावावर खरेदी करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता पीके एमएसपीवर खरेदी केली जाणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आता राज्यातील दहा पिके किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली जाणार आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सोमवारी (ता.१६) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच कॅनोलच्या पाण्यावर आकारले जाणारे शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हरियाणातील शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा सरकारने केला आहे.

सध्या हरियाणात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे येथील सैनी सरकारने नाराज शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. काहीच दिवसांपूर्वी सरकारने अग्निवीरांबाबत निर्णय घेताना हरियाणा पोलीस, वन विभाग, जेल वॉर्डन या पदांवर १० टक्के आरक्षण जाहीर केले होते.

यानंतर आता याआधीच केलेल्या घोषणेनुसार आणि आधीच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दहा पिकांची किमान आधारभूत किमतीवर (हमीभाव) खरेदी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री सैनी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सैनी यांनी कुरूक्षेत्र शंखनाद रॅलीत दहा पिके हमीभावावर खरेदी केली जातील, असे म्हटले होते. ज्यानंतर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला होता. तर निर्णयानुसार नाचणी, सोयाबीन, काळे तीळ, नायजर बियाणे, करडई, बार्ली, मका, ज्वारी, ताग, कोपरा आणि मूग पिकांची देखील हमीभावाच्या किंमतीनुसार खरेदी केली जाणार आहे. आता हरियाणात आधीचे १४ आणि नवी १० अशी २४ पिकांची हमीभावाच्या किमतीनुसार खरेदी होणार आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सोमवारी (ता.१६) झालेल्या बैठकीत कॅनोलच्या पाण्यावर आकारले जाणाऱ्या शुल्कावर देखील निर्णय घेण्यात आला. 'अबियाना' (कॅनोल वॉटर वापरावरील शुल्क) हटवण्यात आल्याची घोषणा सैनी यांनी केली. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू असेल. यामुळे शेतकऱ्यांचे ५४ कोटी वाचतील, असाही दावा सैनी यांनी केली आहे.

यावेळी सैनी यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार काम करत आहे. हमीभावाप्रमाणे सर्व पिके खरेदी करणारे हरियाणा देशातील पहिले राज्य आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांना चालना मिळेल. तर ज्या शेतकऱ्यांनी अबियानातंर्गत पैसे भरले आहेत. त्यांचे पैसे परत केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री सैनी यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT