Farmers' Protest : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा एमएसपीवरून विरोध वाढला; दोन रॅलींचे आयोजन

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध वाढताना दिसत आहे. हमिभाव कायद्यासाठी आता सरकारवर बदाव वाढण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. तर यासाठी राज्यात दोन मोठ्या रॅलींचे आयोजन केले जाणार आहे.
Farmers Protest
Farmers Protest Agrowon
Published on
Updated on

Pune News : हरियाणात विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजला आहे. यादरम्यान हमिभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी देखील आपला विरोध तीव्र केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी दोन मोठ्या रॅलींचे आयोजन शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. यातील पहिली रॅली रविवारी (ता.१५) काढण्यात येणार आहे.

हमिभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजूर संघर्ष मोर्चाकडून राज्यात दोन रॅली आणि महापंचायतीचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) जींद येथे पहिली रॅली आणि महापंचायत भरणार आहे. तर पुढच्या रविवारी (ता.२२) पिपली येथे एका रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.

Farmers Protest
Farmer Protest : शंभू सीमा उघडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली उच्चाधिकार समिती

किसान मजूर मोर्चाचे नेते सरवणसिंह पंढेर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, हरियाणा आणि पंजाबच्या काही जिल्ह्यांमधील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रॅली काढतील. यावेळी जींद येथे महापंचायतीचे आयोजन केले जाईल. तेथेच पुढची रनणीती आखली जाईल. सध्या सत्ताधारी भाजप सरकारविरोधात शेतकरी आक्रमक असल्याचेही पंढेर यांनी म्हटले आहे. यादरम्यान हरियाणातील कुरूक्षेत्र जिल्ह्यात जागोजागी एमएसपीवर सूर्यफूल तेलबियांची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

दिल्लीला जावू न दिल्याने १३ फेब्रुवारीपासून पंजाब-हरियाणा सीमेवर हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हमीभाव कायद्याच्या प्रमुख मागणीसह इतर मुद्द्यांवर राज्य सरकार सतत शेतकऱ्यांची आडवणूक करत आहे. त्यामुळेच आता आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना चर्चा करत आहेत. पण आम्ही भाजपवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन न करता सर्व पर्यायांचा विचार करणार असल्याचे पंढेर यांनी म्हटले आहे.

Farmers Protest
Farmers Protest : 'त्या' ७५० शेतकऱ्यांना शहीद दर्जा अन् कुटुंबातील सदस्याला देणार नोकरी ; काँग्रेसची मोठी घोषणा

याआधी पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी संघटनांनी भाजपवर बहिष्काराचे खुले आवाहन केले नव्हते. पण निवडणुकीत भाजपविरोधातील रोष शेतकऱ्यांमध्ये होता. त्यावेळी भाजपसोडून इतर कोणीही अशी हाक शेतकऱ्यांनी दिली होती. पंजाबमध्ये प्रचारासाठी शेतकऱ्यांनी भाजपच्या उमेदवारांना गावातही जाऊ दिले नाही.

आता ही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून ते पंजाब-हरियाणा सीमेवर बसले आहेत. पण अद्यापही शेतकऱ्यांना दिल्ली जाण्याची अनुमती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या कशा मांडायच्या यावर चर्चा करू आणि मगच एकत्रित निर्णय घेऊ. आताही आम्ही भाजप आणि भाजच्या उमेदवारांना विरोध करणार नाही, पण शेतकरी स्वतः ठरवतील, असेही किसान मजूर मोर्चाचे नेते पंढेर यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com