Chhatrapati Sambhajinagar News : अपुरा पाऊस, प्रदीर्घ खंड आणि विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील सोयाबीनच्या कापणी आणि मळणीच्या कामाने वेग पकडला आहे. मराठवाड्यात जवळपास २५ लाख ५९ हजार ७६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात २५ लाख ५९ हजार ७६५ ट्रॅक्टरवर सोयाबीनची गिरणी झाली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात पेरणी झालेल्या ५ लाख ७६ हजार १६१ हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात पेरणी झालेल्या १९ लाख ८३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ऑक्टोबर हिट मध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सोयाबीन वाढण्याचे प्रमाणही वाढले आहे. धाराशिव लातूर जिल्ह्यात येलो मोझॉक, चारकोल रॉट, मुळकुज, खोडकूज आदी आक्रमणाने सोयाबीनचे मोठे नुकसान केले आहे. काही सोयाबीनची वाण त्यांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आतच काढणीला आली आहेत.
त्यामुळे उत्पादनात घट येणार हे जवळपास स्पष्ट आहे. लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यात सोयाबीनची २०१७ ते २०२१ २२ दरम्यान सरासरी हेक्टरी उत्पादकता दहा क्विंटल ९९ किलो इतकी आहे.
त्या तुलनेत यंदाच्या २०२३ २४ या खरीप वर्षात पावसाचे थंड कीड रोगांचे आक्रमण लक्षात घेता प्रथम नजर अंदाजानुसार सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सहा क्विंटल त्रेचाळीस किलो येणे अपेक्षित असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनात मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. दुसरीकडे सोयाबीन काढणीसाठी लातूरच्या काही भागात एकरी सहा हजाराच्या पुढे तर धाराशिवच्या काही भागात एकरी साडेपाच हजाराच्या पुढे रक्कम मोजावी लागत असल्याची शेतकऱ्यांनी सांगितले.
आमचे सोयाबीन काढणीला द्यायची म्हणून मजुराच्या मागे फिरतोय. दहा बॅग सोयाबीन काढणीला जवळपास ६५ हजार रुपये खर्च येतोय. उंची कमी असल्याने हार्वेस्टर घालता येत नाही. शिवाय उत्पादन किती होईल माहीत नाही.- जगन्नाथ पुणे, सोनखेड, ता. अहमदपूर जि. लातूर
यंदा सोयाबीनची ७५३ वाणाची पेरणी केली. १०० दिवसाचा हा वाण वेळे आधीच काढणीला आला आहे. त्यावर करपा आणि येलो मोझॅक आहे. काढणीला साडेपाच हजार एकरी खर्च येतोय.- सागर कोळपे, सांगवी, ता. जि. धाराशिव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.