Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : पश्चिम पट्ट्यात भाताची कापणी सुरू

Paddy Crop : अनेक ठिकाणी भाताचे पीक भुईला लोळत असल्याचे चित्र आहे. नुकसान मोठ्या प्रमाणावर असून आता थोडाफार वाचलेला हा भात शिवारातून बाहेर आणण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. मात्र ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान आहे. अनेक ठिकाणी भाताचे पीक भुईला लोळत असल्याचे चित्र आहे.

नुकसान मोठ्या प्रमाणावर असून आता थोडाफार वाचलेला हा भात शिवारातून बाहेर आणण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी भाताची कापणी सुरू केली. मात्र मजूर टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

पावसाच्या अनियमिततेमुळे लागवडी मागे पुढे झाल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी आवणी पूर्ण झाल्या. मात्र लोंबी मध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत अनेक ठिकाणी करपा सदृश रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अगोदर वातावरण बदलांच्या फटका तर पुन्हा नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात भात पीक सापडले आहे.

मुसळधार पाऊस झाल्याने इगतपुरी,त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात पीक आडवे झाले आहे. मात्र आता वाचलेले भात पीक शेतातून बाहेर आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिरायती पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती नसल्याने भात पिकाकडे ओढा असतो. तुलनेत नागली, वरई, खुरसणी या पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे.

एकीकडे लागवड ते काढणीपर्यंतचा खर्चही शेतकऱ्यांना परवडणारा नाही. भात पिकासाठी सुरुवातीला लागवडीसाठी मजुरांची टंचाई होती. त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाला. पीक कापणीसाठी आले असताना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू आहे.

भात कापणीत अडचणीचा सामना

वादळी वाऱ्याचा पावसामुळे भात पीक आडवी झाल्याने यंदा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून होणारे कामकाजही करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना मजुराची उपलब्धता करावी लागत आहे. मात्र मजुरी भेटत नसल्याने काही ठिकाणी घरगुती पातळीवर कामकाज सुरू आहे. तर काही ठिकाणी अधिकचे पैसे मोजून भात पीक कापणी करावी लागत आहे.

यंदा रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवडीचे नुकसान होते मात्र पाऊस आणि वादळी वाऱ्याने भात आडवा पडल्याने नुकसानीचा टक्का वाढला आहे. अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान आहे. तर अनेक ठिकाणी ५० टक्क्यांवर ते दिसून येते. यंदाचे वर्ष भात उत्पादकांसाठी अडचणीचे ठरले असेच आहे.
- वसंत भोसले, भात उत्पादक, धामणी, ता. इगतपूरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

SCROLL FOR NEXT