Sugarcane Farmer agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer : ऊसतोड टोळ्यांकडून शेतकऱ्यांची उघड लुबाडणूक, साखर कारखानदारांची मिलीभगत?

Maharashtra Sugarcane : राज्यात गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांमध्ये संघर्ष सुरू आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane farmers Kolhapur : राज्यात गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांमध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान शेतकऱ्यांवर आता ऊस शेतातून बाहेर काढण्यासाठी नवा संघर्ष करण्याची वेळ येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसतोडणाऱ्या टोळ्या फडकरी यांच्याकडून खुशालीच्या नावाखाली भरमसाठ लूटमार सुरु आहे. खुशाली दिल्याशिवाय तुमच्या उसाला कोयता लावणारच नाही अशीच भूमिका ऊस तोडणाऱ्यांनी घेतली आहे.

यंदा कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या संघर्षामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले. यामुळे जिल्ह्यातील काही टोळ्या कर्नाटकात गेल्याने कारखान्यांची काही अंशी यंत्रणा डळमळीत झाली आहे. दरम्यान टोळ्या कमी असल्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुळात यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने उसाची पळवापळवी सुरू आहे. पण एकही कारखाना जादा दर देण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार अशीच स्थिती बनली आहे.

ऊस तोड करणाऱ्याच्या भूमिकेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, कारखानदारांचे मात्र या प्रकाराकडे नेहमीप्रमाणेच सोयीस्कर दुर्लक्ष सुरू आहे. मुळात उसाचे उत्पादन घटले आहे, त्यात टोळ्यांची वसुली शेतकऱ्यांना न परवडणारी ठरत आहे. अशा स्थितीतही टोळ्यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत.

कारखान्यांना वेळेत ऊस घालविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन टोळ्या उघडपणे खुशालीची मागणी करीत आहे. सुरुवातीपासूनच ही खुशालीची पद्धत सुरू केली आहे. प्रतिटनामागे १०० रुपये घेतली जाणारी खुशाली आता ५०० रुपयांवर पोहोचली आहे.

एक एकरातील ऊस घालविण्यासाठी पाच ८ हजार रुपये खर्च येत आहे. उत्पादन कमी, त्यात ऊस घालवण्यासाठीचा खर्च पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. टोळ्यांवर कारखानदारांचे नियंत्रण नसल्याने हे दर वाढतच चालले आहेत.

ऊस नको रे बाबा...!

ऊस घालवण्यासाठी मोठ्या शेतकऱ्यांना टोळ्यांची सरबराईच करावी लागते. त्यांची राहण्याची सोय करण्यासह आठवड्यातून एकदा मांसाहारी जेवणाचा बेत आखावा लागतो. कधी कधी ओल्या पार्टीचेही नियोजन करावे लागते. त्यांच्या राशनसाठी पैसेही द्यावे लागतात.

ट्रॅक्टरचालकाची एंट्री फीसुद्धा ४०० ते ५०० रुपये झाली आहे. ही सरबराई करताना शेतकरी अक्षरशः वैतागला असून, ऊस नको रे बाबा...! असे म्हणण्याची वेळ आल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

Nisaka Protest: ‘निसाका’ बचावसाठी सर्वपक्षीयांचा एल्गार 

Pulses Sowing: बारामतीत कडधान्य क्षेत्रात यंदा वाढ

Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT