Milk Dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Milk Production : दूध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झाला असून तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होत आहे.

Team Agrowon

Nagar News : प्रतिकूल परिस्थिती असलेल्या संगमनेर तालुक्यात विकासातून मोठी समृद्धी निर्माण झाली आहे. दूध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झाला असून तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. गोरगरीब व सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असे मत माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. आमदार थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, ॲड माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, राजेंद्र चकोर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, की दूध व्यवसाय कष्टाचा आणि अडचणीचाही आहे. येथे दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होते. राजहंस दूध संघाने गुणवत्ता व चांगल्या कारभारातून राज्य पातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. सहकारी संघांमुळेच खासगी संघांवर नियंत्रण असते. ५० पैसे भाव वाढीव मिळाला म्हणून काही लोक खासगी संघाना दूध देतात आणि दर कमी झाला की सहकाराकडे येतात.

हे अत्यंत चुकीचे आहे. दुधाला भाववाढ मिळावी म्हणून आपण विधानसभेत भांडलो, त्यामुळे पाच रुपये अनुदान मिळाले. रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून कोरोना संकटात दररोज दहा लाख लिटरची पावडर निर्माण केली गेली. त्यातून दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात मुक्त गोठा व मुरघास ही संकल्पना अत्यंत चांगली राबवली जात आहे. जास्त दूध देणाऱ्या गाई आपल्याला निर्माण कराव्या लागणार आहे.

संगमनेर तालुक्यात ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २५ डॉक्टरांचे पथक १२५० गाईंचा गट करून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणी यांसह गायभरणीसाठी विदेश सॉर्टेड सिमेंट वापरून ५० लिटर दूध उत्पादित करणारी गाय निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचबरोबर संगमनेर तालुका दूध संघात सौर ऊर्जा युनिट बसवले जाणार असून तालुक्यातील गाव पातळीवर संस्थांवर सुद्धा सौर ऊर्जा युनिट बसवले जाणार आहे. शासनाचे पाच रुपये अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना वाटप केले असल्याचीही ते म्हणाले.\

एकनिष्ठतेमुळे राष्ट्रीय पातळीवर गौरव

बाळासाहेब थोरात म्हणाले, की काँग्रेसची राष्ट्रीय कमिटी ही सर्वोच्च असून १९४८ मध्ये अच्युतराव पटवर्धन यांची निवड झाली होती. त्यानंतर आपली निवड झाली आहे. पक्षावर निष्ठा, विचारांशी बांधिलकी, तत्त्वनिष्ठ हे आपण कायम जपले. कधीही सत्तेसाठी उड्या मारल्या नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

SMART Agri Project: ‘स्मार्ट’ पाऊल पुढे पडो

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

SCROLL FOR NEXT