Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : प्राथमिक अंदाजातील नुकसानीचे निम्मे पंचनामे उरकले

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या १९ लाख ७४ हजार ४०० हेक्टरपैकी १० लाख ५७ हजार ९७७ हेक्टरवरील म्हणजे जवळपास ५३.५८ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे ओळखल्याची माहिती प्रशासनाचा सूत्रांनी दिली.

यंदा सुरुवातीपासूनच लहरीपणाचा परिचय देणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्ये सुरुवातीलाच मराठवाड्यात चांगलाच धुमाकूळ घातला. अवघ्या २४ तासांत मराठवाड्यातील तब्बल २८४ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान होणार हे स्पष्टच होते.

प्रशासनाच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यानंतर आलेल्या सततच्या पावसामुळे मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत ५७४७ गाव शिवारातील तब्बल १९ लाख ७४ हजार ४००.८९ हेक्टर वरील २४ लाख २१ हजार ११६ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले.

त्यामध्ये १९ लाख २४ हजार ९०७.८९ हेक्‍टरवरील जिरायती २८ हजार ३८३ हेक्टर वरील बागायत, तर २१ हजार ११० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. त्यापैकी १० लाख ५७ हजार ९७७ हेक्टरवरील ११ लाख ७९ हजार ७३० शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

लातूर, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांची पंचनाम्यात आघाडी असून बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची गती मंद असल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ६५१, जालन्यामधील ४८९, परभणीतील ८१७, हिंगोलीतील ७०४, नांदेडमधील १४७५, बीडमधील ८७६, लातूरमधील ४५०, धाराशिवमधील २८५ गाव शिवारातील शेती पिकांचे सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्ती नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय पंचनामा झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी पंचनामा क्षेत्र

छ.संभाजीनगर ३६३२० २९२६५

जालना १३७३७१ १३९२५३.५१

परभणी ३६१७७६ २९२०६५

हिंगोली २२४८८७ २३००८३.५

नांदेड ११८५१० १०२६५०

बीड ६६४८४ ७३३४६.५३

लातूर २३४३०६ १९०७०६.८३

धाराशिव ७६ ६०६.७

जिल्हानिहाय नुकसान झालेले शेतकरी व क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी नुकसान क्षेत्र

छ.संभाजीनगर ३१६०५९ १७६९३६.७

जालना २५४१२७ २१२४६६.७२

परभणी ४५९०१२ ३५१५७८

हिंगोली २८१६८८ २८१६७९

नांदेड ६४४७६४ ४९८४०९

बीड २०८२१२ २५१५११

लातूर २५०७१४ १९५७५४.१०

धाराशिव ५८१० ६०६७

पंचनामे झालेली जिल्हानिहाय टक्केवारी

छत्रपती संभाजीनगर १६.५४

जालना ६५.५४

परभणी ८३.०७

हिंगोली ८१.६८

नांदेड २०.६०

बीड २९.६

लातूर ९७.४२

धाराशिव १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT