Gurudatta Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘गुरुदत्त शुगर्स’ एकरकमी विनाकपात ३००१ रुपये दर देणार : घाटगे

Sugarcane Season 2023 : ‘गुरुदत्त शुगर्स’ यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी विनाकपात ३००१ रुपये प्रतिटन दर देणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ‘गुरुदत्त शुगर्स’ यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी विनाकपात ३००१ रुपये प्रतिटन दर देणार आहे. तसेच हंगाम समाप्तीनंतर सरकारच्या रेव्हेन्यु शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार (आरएसएफ) जो दर निघेल तो शेतकऱ्यांना देण्यास ‘गुरुदत्त शुगर्स’ बांधिल असल्याचे प्रतिपादन ‘गुरुदत्त शुगर्स’चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारखान्याच्या २० व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, कारखान्याचे संचालकांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. काटा पूजन सीईओ उदय पाटील व मुख्य शेती अधिकारी विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक संचालक बबन चौगुले यांनी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक. निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव माने, विजय भोजे, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, नगरसेवक डॉ. अरविंद माने, राजवर्धन माने देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, साखर तज्ज्ञ विजय औताडे आदी उपस्थित होते. आभार संचालक शिवाजीराव माने देशमुख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT