Agrowon Sanvad  Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : चहार्डी येथे कापूस पिकाबाबत मार्गदर्शन

Agriculture Seminar : चहार्डी (ता. चोपडा) येथे ‘ॲग्रोवन’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. २०) सायंकाळी कापूस पीक व पाणी व्यवस्थापन यावर चर्चासत्र घेण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : चहार्डी (ता. चोपडा) येथे ‘ॲग्रोवन’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. २०) सायंकाळी कापूस पीक व पाणी व्यवस्थापन यावर चर्चासत्र घेण्यात आले. श्रीराम ठिबक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. गावातील श्री महादेव मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.

व्यासपीठावर जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ व कापूस पैदासकार डॉ. गिरीश चौधरी, कडधान्य पैदासकार डॉ. सुमेरसिंग राजपूत, साईराम प्लॅस्टिक आणि इरिगेशनचे महाव्यवस्थापक अनंत बागूल, चोपडा येथील तापी इरिगेशनचे संचालक नरेंद्र पाटील, प्रगतिशील शेतकरी प्रकाश पाटील, प्रदीप पाटील आदी होते.

गिरीश चौधरी म्हणाले, की कापूस लागवडीत जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. परंतु कापूस उत्पादकता कमी आहे. फक्त ३२९ किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी उत्पादकता जळगावची कापसाबाबत आहे. २००२मध्ये कापसातील बीटीमधील बोलगार्ड १ ही आवृत्ती आली. पुढे बोलगार्ड २ ही आवृत्ती आली.

यामुळे कापूस उत्पादन सतत वाढले. पण २०१४ नंतर कापूस उत्पादन कमी होत गेले. उत्पादन कमी होण्याची कारणे नैसर्गिक व अन्यदेखील आहे. गुलाबी बोंड अळीची समस्या रेफ्युज वाणांची लागवड न केल्याने वाढत गेली. या अळीचे जीवनचक्र नष्ट करण्यासाठी फरदड कापूस किंवा खोडवा कापूस पीक न घेण्याचे आवाहन सतत केले जाते.

परंतु दुर्दैवाने मे महिन्यातही शेतात कापूस पीक उभे दिसते. यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र नष्ट होऊ शकले नाही. ही समस्या रोखण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर हवा आहे, असेही चौधरी म्हणाले.

डॉ. राजपूत म्हणाले, की कडधान्य पिके ही शेतीसाठी आवश्यक असून, जमिनीचे आरोग्य यातून राखता येते. तसेच मानवी आरोग्यासाठीही आहारात कडधान्यांचा वापर वाढायला हवा, असेही ते म्हणाले. अनंत बागूल म्हणाले, की साईराम प्लॅस्टिक आणि इरिगेशनने शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून नवे तंत्र दिले आहे. शेतकरीपुत्र श्रीराम पाटील हे त्यासाठी सतत कार्यरत असतात, शेतकऱ्यांशी कंपनीची नाळ जोडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT