Agro Sanvad : पंचसूत्रीतून आले पीक कमी खर्चात शक्य

Ankush Sonavle : पंचसूत्रीचा वापर केल्यास आले पिकांचे कमी खर्चात यशस्वी उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाचे विषयतज्ज्ञ अकुंश सोनावले यांनी केले.
Ankush Sonavle
Ankush SonavleAgrowon

Satara News : जमीन व्यवस्थापन, लागवड तंत्र, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, आंतरपीक व बाजारपेठाचा अभ्यास करत विक्री व्यवस्था या पंचसूत्रीचा वापर केल्यास आले पिकांचे कमी खर्चात यशस्वी उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाचे विषयतज्ज्ञ अकुंश सोनावले यांनी केले.

पिंपरी (ता. कोरेगाव) येथे ‘ॲग्रोवन’ आणि जिल्हा बँकेच्या संयुक्त विद्यमाने सूर्यकांत पवार व संजय पवार यांच्या शेतावर ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्री. सोनावले बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक सुनील खत्री, भाजप नेते मनोज घोरपडे,

Ankush Sonavle
Milk MSP : दूधाला एमएसपी देणारं हिमाचल प्रदेश देशातलं पहिलं राज्य ; गायी-म्हशीच्या दुधाचा दर निश्चित

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, कृषिभूषण मनोहर साळुंखे, ‘स्वाभिमानी’चे राज्य प्रवक्ते अनिल पवार, ‘ॲग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव, वितरण प्रतिनिधी दत्तात्रय जाधव, ‘सकाळ’चे विजय जगताप आदीची प्रमुख उपस्थिती होती.

नितीन पाटील म्हणाले, की कुटुंबाच्या विभाजनामुळे शेती क्षेत्र कमी होत आहे. यामुळे असलेल्या शेतजमिनीत उत्पादन वाढ झाली पाहिजे या हेतून जिल्हा बँक व ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून हे कार्यक्रम घेतले जात आहे. सुनील खत्री, मनोहर साळुंखे यांनी आले पिकाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विठ्ठल निकम, राजेंद्र घाडगे, विजयकुमार जाधव, किशोर घाडगे, विठ्ठल मुळीक, संजय गोरे, सुरेश भोसले,

Ankush Sonavle
Sugarcane Growth : उसाची वाढ आणि दरप्रश्‍नाचा अभ्यास

नानासाहेब पवार, प्रसन्न कुलकर्णी, अणासाहेब घाडगे, रणजीत भोसले, विष्णूपंत कणसे, तुषार जाधव, काकासाहेब गायकवाड, अनंतराव माने, ऋषिकेश तुपे, प्रशांत जाधव, राहुल निकम, विक्रम कदम, आनंदराव साळुंखे, उद्धव कदम, सुरेश पवार, नारायण पवार, सहदेव पवार, सागर पवार तसेच परिसरात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र भिलारे यांनी प्रस्ताविक तर अनंत साबळे यांनी सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले.

गतवर्षी आले खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून नवे-जुने दर अशा विभागणीचे षडयंत्र केले होते. या षड्‍यंत्राविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत जागोजागी छापे टाकत माल जप्त केला. या आंदोलनाच्या राज्यभरात ॲग्रोवन-सकाळने बातम्या प्रसिद्ध करत दरासाठी शेतकऱ्यांच्या बाजून ठोस भूमिका घेतली. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला.
अनिल पवार, राज्यप्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com