Agricultural Science Center agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Science Center : बुलडाणा येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठकीत मार्गदर्शन

Team Agrowon

Buldhana Agricultural Science Center : बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रांतंर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २८ वी सभा चिखली तालुक्यातील दिवठाणा येथे झाली. अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी विष्णू इंगळे होते.

केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे, कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कानवडे, चिखली तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, मंडळ कृषी अधिकारी डी. एल. लंबे, केव्हीकेचे विषयतज्ज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख (पशु संवर्धन), डॉ. सुकेशनी वाणे (कृषी अभियांत्रिकी), डॉ. भारती तिजारे (कृषी विद्या) यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी पिकांवरील रोग व कीड यांच्या प्रभावी व्यवस्थानाकरिता सूक्ष्मजीवांचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. दिनेश कानोडे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र बुलडाणा यांनी शेतीमधील शून्य मशागत पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.

अशोक सुरडकर, तालुका कृषी अधिकारी चिखली यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. डॉ. एन. एस. देशमुख, विषय विशेषज्ञ पशु संवर्धन यांनी शेतीला जोडधंदा असलेले दुधाळ जनावरांची निगा याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. भारती तिजारे, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या यांनी खरीप पिकांची सुधारित लागवड पद्धती याबाबत माहिती दिली.

डॉ. सुकेशनी वाणे विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी कृषी अवजारांबाबत व भूजल पुनर्भरणाबाबत माहिती दिली. हरिभाऊ येवले यांनी बायोचारचा शेतातील वापर याबाबत अनुभव सांगितला. सूत्रसंचालन डॉ. सुकेशनी वाणे यांनी केले.

कार्यक्रमासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे विजय भुतेकर, विष्णू भाऊ इंगळे, देवठाणा यांनी नियोजन केले. मंचाचे हरिभाऊ येवले, मोहन जगताप, स्वप्नील महाजन, प्रकाश सपकाळ, सतीश वारे, सर्जेराव पाटील आदी सदस्य आणि देवठाणा गावातील एकूण ५७ प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभारावे

Electricity Departments Action: सिंगल फेज वापरणाऱ्या १९२ जणांवर कारवाई

Wildlife Protection: वाहनांसह बचाव साहित्य वन विभागाकडे सुपूर्द

Kharif Season Planning: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध : शंभूराज देसाई

HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा

SCROLL FOR NEXT