Agriculture Land Issue: शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा प्रकल्प असून, यामुळे सुपीक शेती जमीन गमावण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सबब बाधित शेतकऱ्यांनी शासनाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता याविरोधात तीव्र आंदोलन उभारावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. .ते करकंब येथे आयोजित शक्तिपीठ महामार्ग विरोधी जनआक्रोश मेळाव्या प्रसंगी बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष सचिन आटकळे, जिल्हा संघटक शहाजान शेख, विजय रणदिवे, तानाजी बागल, बाहुबली सावळे, विठ्ठल हराळे, बाळूअण्णा व्यवहारे, .Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात शेतकऱ्यांचा एल्गार, संयुक्त मोजणी रोखण्याचा इशारा.अंकुश व्यवहारे, बाळासाहेब हराळे, महेश व्यवहारे, आदीसह हजारो शेतकरी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले की, देशाच्या संविधानाने नागरिकांना आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार दिला आहे. शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. .Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात उठाव करू.सभेस उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संयुक्त मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा निर्धार व्यक्त केला. करकंब परिसरातील सुमारे चारशे एकर द्राक्षबागा व शंभरहून अधिक शेततळी बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी एकजुटीने या प्रकल्पाविरोधात वज्रमूठ उगारली. .शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शक्तिपीठ महामार्ग हा जनतेच्या गरजेपेक्षा काहींच्या आर्थिक फायद्यासाठी राबवला जात आहे. सभेस उपस्थितांनी स्पष्ट केले, की पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मार्गांना त्यांनी कधीही विरोध केला नाही. मात्र सध्याचा शक्तिपीठ महामार्ग हा गरजेपेक्षा वेगळ्या हेतूने राबवला जात असल्याचा आरोप करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.