Buldana Agriculture : शेतीपूरक व्यवसायांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Orchard Farming : जिल्ह्यातील शेतकरी फळबाग लागवड तसेच शेतीपूरक व्यवसायांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच यंदा मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर योजनांतून चार हजार हेक्टरवर फळबागांची लागवड होऊ शकली, असे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
Fruit Farming
Orchard Plantation Agrowon
Published on
Updated on

Buldana News : जिल्ह्यातील शेतकरी फळबाग लागवड तसेच शेतीपूरक व्यवसायांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच यंदा मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर योजनांतून चार हजार हेक्टरवर फळबागांची लागवड होऊ शकली, असे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

तसेच, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करूया आणि बुलडाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्राच्या ६६व्या स्थापना दिन व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

Fruit Farming
Agro Based Business : शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायांना प्राधान्य द्यावे

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, माजी आमदार विजयराज शिंदे, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना व अटल भूजल योजनेअंतर्गत सुमारे ३३ हजार लाभार्थ्यांना ७९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

तसेच, पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एक लाख ५० हजार शेतकऱ्यांना १४४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने सुमारे ४९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वाटप केला आहे.

Fruit Farming
Agro Tourism Business : शेतीपासून पर्यटन व्यवसायापर्यंतचा यशस्वी प्रवास

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक, म्हणजेच ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ४७ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी तयार केला नाही, ते शासनाच्या योजनांपासून वंचित राहू शकतात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सध्याची स्थिती विचारात घेता, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने योग्य व प्रभावी उपाययोजना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू प्रथमेश समाधान जवकार याच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठित ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ मिळाल्याचा सर्वांना सार्थ अभिमान असल्याची भावना पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com