Government Schemes: खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कृषी निविष्ठांचा कोणताही तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले..जिल्हा नियोजन भवन येथे खरीप हंगाम नियोजन २०२६ आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपाध्यक्ष राजू भोसले, कृषी सभापती लता कर्णे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे उपस्थित होते. बैठकीत पर्जन्यमानाचा अंदाज, बियाणे व खतांचा साठा, पाण्याचे नियोजन आणि आवर्तन याबाबत सविस्तर चर्चा झाली..Kharif Season Planning : कृषी विभागाने खरिपाच्या गावनिहाय बैठकीचे आयोजन करावे ः देशमुख.पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, बोगस खत विक्री, निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री आणि खतांची लिंकिंग पद्धत पूर्णतः बंद झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणीसाठी मार्गदर्शन करावे, तसेच तपासणी पथकांनी कारवाई अधिक प्रभावी करावी..जिल्ह्यात कुठेही खतांचा तुटवडा जाणवल्यास तात्काळ प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या..काळोली बीज गुणन केंद्रातील कृषी प्रशिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत, बारामती येथील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी नमूद केले..Kharif Season Planning : तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शेतकऱ्यांना किमान ५० ते ६० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला दिला. यावर्षी कमी पर्जन्यमानाची शक्यता असल्याने पिकांचे योग्य नियोजन करावे व कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले..जिल्ह्यातील एकूण पेर क्षेत्र ५.३४ लाख हेक्टर असून खरीप हंगामासाठी ४.१२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यासाठी सुमारे ४१,५७९ क्विंटल बियाणे आणि १.०२ लाख मेट्रिक टन खतांची गरज आहे. सध्या ६० हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असून उर्वरित नियोजन सुरू आहे. युरियाचा ३,७५० मेट्रिक टन बफर स्टॉक ठेवण्यात येणार आहे..नियंत्रण कक्ष सुरूकृषी निविष्ठांबाबत तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून ७४९८९२१२८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२६ पासून १,४८८ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली असून १११ जणांना नोटिसा, ६० जणांवर कारवाई, ३० परवाने निलंबित आणि १० जणांना विक्री बंदी करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.