Gudipadwa Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Gudipadwa Farmer: सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याने उभारली द्राक्षे, लसूण व कांद्याची गुढी

या हंगामात कांदे मातीमोल भावात विकावे लागले होते. नैताळे येथीलच एक शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला होता.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक: हिंदू सणामधील गुढीपाडवा हा पहिला सण. या दिवशी नवीन वस्त्र, लिंबाची डहाळी यांनी गुढी उभारली जाते मात्र नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी चक्क कांदा, लसूण व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे उत्पादन घेतले जाते. मात्र मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच्या वल्गना करीत असले तरी अद्याप नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले नाही तेव्हा मदत तर दूरच आहे.

या हंगामात कांदे मातीमोल भावात विकावे लागले होते. नैताळे येथीलच एक शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला होता.

संजय साठे हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी बराक ओबामा यांची भेट घेऊन शेतीविषयक चर्चा केली होती.

त्यांनी कांदे विकून मिळालेल्या अल्प रकमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानिऑर्डर तर कधी टोपी उपरणे पाठवून त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

त्याचप्रमाणे त्यांनी लसूण, कांदा व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे मी माझ्या शेतात पिकलेल्या द्राक्षे, कांदा व लसूण यांची गुढी उभारली आहे.

पाऊस व गारांनी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता आजच्या नवीन वर्षापासून खंबीरपणे उभे राहून कामाला सुरुवात करावी.

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे या उद्देशाने मी द्राक्षे व कांद्याची गुढी उभारून संदेश दिला आहे.

-संजय साठे, शेतकरी नैताळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT