Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : काजू बी दरावरून उत्पादक संभ्रमात

Cashew Production : सिंधुदुर्गात काजू बी दरावरून कधी नव्हे इतका संभ्रम काजू उत्पादकांमध्ये निर्माण झाला आहे

एकनाथ पवार

Sindhudurg News : ः सिंधुदुर्गात काजू बी दरावरून कधी नव्हे इतका संभ्रम काजू उत्पादकांमध्ये निर्माण झाला आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी काजू बीला १३५ रुपये दर दिला जाईल, असे जाहीर केले असले तरी आठवडे बाजारामध्ये १०५, ११० तर काही ठिकाणी १२० रुपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे. खरेदी विक्रीवर कुणाचाही अकुंश नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.

जिल्ह्यात काजू बी दरावरून जोरदार आंदोलने सुरू आहेत. दोडामार्ग येथे शेकडो काजू उत्पादकांनी रास्ता रोको करीत शासनाकडे हमीभावाची मागणी केली. दोडामार्गनंतर मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारादेखील उत्पादकांनी दिला आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने मंत्री केसरकर यांनी काजू बीला प्रतिकिलो १३५ रुपये दर दिला जाईल, असे जाहीर केले.

या घोषणेने काजू उत्पादकांचे समाधान झालेले नाही. काजू उत्पादक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मंत्री केसरकरांनी १३५ रुपये दर जाहीर केला असला तरी जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या दराने काजू बी खरेदी केली जात आहे. बांदा बाजारपेठेत सर्वाधिक १२० रुपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे.

तर कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड या बाजारपेठांमध्ये १०५ ते ११५ रुपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे. वैभववाडी आठवडे बाजारातदेखील व्यापाऱ्यांनी प्रतिकिलो ११० रुपयांनी काजू बी खरेदी करण्यास सुरुवात केली.

परंतु सिंधुवैभव शेतकरी कंपनी येथे १२० रुपयांनी काजू बी खरेदी करीत असल्याने व्यापाऱ्यांना देखील त्याच दराने काजू बी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे काजू बी दराबाबत उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक उत्पादकांनी काजू विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

काजू विक्री येण्याचे प्रमाण अल्पच

मार्च हा काजू बी खरेदीचा महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात अधिकतर काजू बी विक्रीसाठी आणली जाते. परंतु काजू बीचा दर निश्चित होत नसल्याने काजू बागायतदारांनी काजू बी विक्री करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आठवडे बाजारात सध्या अल्प प्रमाणात काजू बी विक्रीकरिता येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: फौजदाराचा झाला हवालदार

Aravalli Mountain Range: अरवलीची हाक

Dairy Business Development: दूध व्यवसायातील भेसळीचा कलंक पुसून टाकणार: आयुक्त तुकाराम मुंडे

Technology on Wheels: ‘टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स’ पुण्यात आज सुरू होणार

Cotton Revolution Initiative: केंद्राच्या ‘कपास क्रांती’साठी राज्यातील १९ जिल्ह्यांची निवड

SCROLL FOR NEXT