Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Ground Water Level : गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते.

Team Agrowon

Nandurbar News : या आठवड्यापासून पाऊस थांबल्याची स्थिती आहे. पण यंदा या महिन्यातही पाऊस झाल्याने सर्वच बंधारे ओसंडून वाहत आहेत. पाण्याचा वापरही कमी असून, जलस्तर वाढीस मदत झाली आहे.

मागील वेळेस पाऊस कमी होता. यातच उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढली होती. शेतकरी, ग्रामस्थ हैराण झाले होते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते.

जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पावसाळ्यात पाण्याचा टिपूसही न साठल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. पण ही चिंता मिटली आहे. जलस्तरही जिल्ह्यात सर्वत्र वाढला आहे. रब्बीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

तळोदा, शहादा तालुक्यात अनेक भागांतील बोअरवेल्स आटल्याने बागायती शेती फुलणार व वाढणार आहे. तळोदा, शहादा तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तालुक्याची बागायतदार तालुका म्हणून सर्वदूर ओळख आहे. केळी, पपई, ऊस व मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

पण या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मागील वेळेस पाण्याची पातळी खोलवर गेल्याने एप्रिल व मेमध्ये पिकांची स्थिती बिकट झाली होती. केळीबागा धोक्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या. अनेक बोअरवेल्स कोरडे व्हायला लागले होते. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे आता त्याचा लाभ दिसत आहे.

भूजल स्तर उंचावला

शासनाची ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुराचे पाणी अडविण्यासाठी आतापासून उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जानेवारीत विविध सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तळोदा, नवापूर, तसेच शहादा तालुक्यात विविध संस्थांनी व अन्य नदी पात्रात नदी नांगरटी करण्याच्या उपक्रम राबविला होता.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन गोमाई नदीत नांगरटी केली होती. ज्याच्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी नांगरटी केल्या गेलेल्या चाऱ्यांमध्ये थांबले. पूर आल्यानंतरही त्याचा लाभ झाला. कारण जलपातळी ९० ते १०० फुटांपर्यंत काही भागात आली आहे. पूर्वी ही जलपातळी १९० फुटांपर्यंत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

NCP Ajit Pawar Group : बीडमध्ये अजित पवार गटाची चिंता वाढली?; पाटोदा बाजार समिती घोटाळा प्रकरणात बांगर यांना अटक

SCROLL FOR NEXT