Water Storage : नांदेडमधील प्रकल्पात ८४ टक्के पाणीसाठा

Water Stock : हा पाणीसाठा मागीलवर्षापेक्षा अधिक आहे. यासोबतच जिल्ह्याशेजारी असलेले सिद्धेश्‍वर, येलदरी, इसापूर हे मोठे प्रकल्पही काठोकाठ भरले आहेत.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड पाटबंधारे विभागातील एकूण १०४ प्रकल्पात ६१३.१९ दशलक्ष घनमीटरनुसार ८४.२२ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा मागीलवर्षापेक्षा अधिक आहे.

यासोबतच जिल्ह्याशेजारी असलेले सिद्धेश्‍वर, येलदरी, इसापूर हे मोठे प्रकल्पही काठोकाठ भरले आहेत. यामुळे आगामी रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता बळावली आहे., अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसाअभावी धरणसाठ्यात घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. परंतु यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढायला सुरुवात झाली.

Water Storage
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीसाठा झपाट्याने वाढला. सध्या जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात ६१३.१९ दशलक्ष घनमीटरनुसार ८४.२२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात १३८.२१ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १३७.८३ दलघमीनुसार ९९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यात शून्य टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात १७०.१९ दलघमीनुसार ९८.४९ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ८६.१७ दलघमीनुसार ४५.४० टक्के पाणीसाठा आहे.

Water Storage
Marathwada Water Storage: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त साठा ८८ टक्क्यांवर

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ७९५ दलघमीनुसार ९८.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ८८.३३ दलघमीनुसार ९९.२२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ९६४.१० दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे विभागातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी ८०.७९ १००

मानार १३८.२१ १००

मध्यम प्रकल्प (९) १३७.८३ ९९.११

लघू प्रकल्प (८०) १७०.१९ ९८.४९

उच्चपातळी बंधारे (९) ८६.१७ ४५.४०

एकूण प्रकल्प १०४ ६४३.१९ ८४.२२

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ७९५.०० ९८.१८

सिद्धेश्‍वर ८०.३३ ९९.२२

इसापूर ९६४.१० १००.००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com