Onion Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Rate : कांदा बियाणे उगवणीसह दरांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी

Seed Germination : कांदादरातील स्थिरता लक्षात घेऊन अनेक जण कांदा लागवडीकडे वळले आहेत. परंतु शेतकऱ्यांची कमी दर्जाचे व अन्य दुय्यम बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्या खानदेश व लगत तयार झाल्या आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : कांदादरातील स्थिरता लक्षात घेऊन अनेक जण कांदा लागवडीकडे वळले आहेत. परंतु शेतकऱ्यांची कमी दर्जाचे व अन्य दुय्यम बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्या खानदेश व लगत तयार झाल्या आहेत. या बाबत चोपड्यासह अन्य भागांतील शेतकऱ्यांत तक्रार आहे.

कमी दर्जाचे किंवा हवी तशी उगवणक्षमता नसलेले बियाणे काहींनी शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. बियाण्याचे दरही चढेच ठेवण्यात आले. काही पुरवठादार जळगावात अल्प दरात शेतकऱ्यांकडून कांदा बियाण्याची खरेदी करतात व त्यांची अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांना विक्री करतात.

यातच मागील वर्षी व यंदाही काही कांदा बियाणे पुरवठादारांनी दुय्यम दर्जाच्या बियाण्याची चकचकीत पॅकिंगमध्ये शेतकऱ्यांना १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री केली आहे. याच बियाण्याची खरेदी शेतकऱ्यांकडून मागील वेळेस १०० ते २०० रुपये प्रतिकिलो या दरात केली होती. तर यंदाही कांदा बियाण्याची खरेदी या पुरवठादारांनी मध्य प्रदेशसह अन्य भागातून जुजबी दरात केली.

यात कंपन्या मालामाल होत असतानाच कांदा बियाणे उगवणीच्याही तक्रारी आहेत. तसेच उगवण झाल्यास पुढे कांदा उत्पादनही कमी मिळत आहे. यामुळे अनेक शेतकरी पुणे, नगरसह कृषी विद्यापीठाकडून निर्मित कांदा बियाणे खरेदी करीत आहेत. कारण कांदा पिकास खर्च अधिक लागतो. पुढे हा खर्च करून चांगले उत्पादन, हवे तसे उत्पादन हाती न आल्यास अडचणी तयार होतात.

दोन्ही हंगामांचे बियाणे ठरतेय फसवे

मागील वेळेस व यंदाही जळगावातील काही पुरवठादारांनी आपले बियाणे उन्हाळ कांदा व खरिपातील किंवा लेट खरीप कांदा उत्पादनासाठी केले. यात ज्यांनी उन्हाळ हंगामात मागील वेळेस या बियाण्याचा वापर केला, त्या शेतकऱ्यांच्या कांद्याला निम्माच दर किंवा अल्प दर बाजारात खरेदीदारांनी दिला.

कांदा बाजारात विक्रीच्या वेळेस पोचल्यानंतर आपली बियाण्यात फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यात मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला. असाच प्रकार यंदाही सुरू आहे. याला आवर घालण्यात कृषी विभाग कुचराई करीत आहे. यामुळे कृषी विभागाची भूमिकाही संशयाच्या फेऱ्यात आहे.

कंपन्या मालामाल

कांदा बियाणे पुरवठादार, उत्पादक मागील काही वर्षांत मालामाल झाले आहे. काहीची कोट्यवधींची मालमत्ता तयार झाली आहे. शेती-जमिनींची खरेदी करण्यात ही मंडळी अग्रेसर आहे. अर्थात, अल्प दरात खरेदी केलेल्या कांदा बियाण्याची अनेक पट दरात विक्री करणे व मोठा नफा मिळविणे, असा प्रकार सुरू आहे. दुसरीकडे कांदा उत्पादक तोट्यात आहेत.

त्यांची बियाण्यात फसवणूक झाली, हे कृषी विभाग किंवा शासन लक्षात घेत नाही. या बाबत केंद्रीय वित्तीय विषयक संस्था (ईडी, आयकर) आदींनी तपासणी करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT