Dr.Ambedkar Jayanti Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यभरात अभिवादन

14th April Celebration : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यभरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यभरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महामानवाला अभिवादन करून त्यांच्याप्रती आदर व्यक्‍त करण्यात आला. यानिमित्ताने नागपूर येथील दिक्षाभूमीवर हजारो अनुयायींनी उपस्थित राहात डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त देशासह राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आले. राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्‍सेना, सहसचिव श्‍वेता सिंघल तसेच राजभवन येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर येथील संविधान चौक तसेच दिक्षाभूमी येथे देखील हजारोंच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीदिनी दिक्षाभूमी नजीकच्या भागातून बाबासाहेब यांच्याशी संबंधित पुस्तके व संबंधित छायाचित्रे व इतर साहित्याची खरेदी देखील करण्यात आली. राज्यभरात शासकीय कार्यालयांत देखील या निमित्ताने विविध कार्यक्रम झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT