Agriculture Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : परभणीत कृषी तरंग महोत्सवाचे उद्घाटन

Agriculture News : कृषी विभागातर्फे शुक्रवार (ता. ७) ते रविवार (ता. ९) हे तीन दिवस कृषी तरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : कृषी विभागातर्फे शुक्रवार (ता. ७) ते रविवार (ता. ९) हे तीन दिवस कृषी तरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात क्रीडा व कला स्पर्धा घेण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. ७) सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते झाले.

यावेळी कुलसचिव संतोष वेणीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी आर. बी. हारणे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी. टी. सामाले,

कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे (परभणी), लक्ष्मण शिंदे (जिंतूर), शेरखान पठाण (सेलू), गोविंद कोल्हे (पाथरी), प्रियांका कावरे (सोनपेठ), पी. आर. निरस (गंगाखेड), आबासाहेब देशमुख (पालम), संतोष भालेराव (पूर्णा), मंडल कृषी अधिकारी आदी उपस्थिती होते.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की विविध प्रकारच्या खेळातून शारीरिक,मानसिक ताण कमी होतो. खिलाडू वृत्ती वृद्धिंगत होते.कृषी विभागातर्फे शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी विस्तार कार्य केले जाते. या क्रीडा महोत्सवामध्ये कृषी विभागाचे सुमारे २५० खेळाडू सहभागी झाले आहेत.

क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कॅरम, लांब उडी, गोळा फेक, कबड्डी, धावणे, बुद्धिबळ,टेबल टेनिस, चालणे, रस्सीखेच‌ आदी १९ क्रीडा प्रकार तसेच, सुगम गीत गायन, फिशपॉण्ड आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT