Banana Seedling Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Seedlings : ‘ईश्वेद’ची ग्रँड ग्रँड नाइन केळी रोपे आफ्रिकन बाजारपेठांत

Banana Farming : जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ईश्वेद बायोटेकच्या लॅबमध्ये तयार झालेली ऊतिसंवर्धित प्रिमियम ग्रँड ग्रँड नाइन (GGN) केळीच्या रोपांची निर्यात आफ्रिकन बाजारपेठांमध्येसुरू झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा ः जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ईश्वेद बायोटेकच्या लॅबमध्ये तयार झालेली ऊतिसंवर्धित प्रिमियम ग्रँड ग्रँड नाइन (GGN) केळीच्या रोपांची निर्यात आफ्रिकन बाजारपेठांमध्येसुरू झाली आहे.

या उपक्रमाअंतर्गत दोन दिवसांपूर्वी सुमारे ५० हजार रोपे पहिल्या टप्प्यात रवाना करण्यात आल्याची माहिती ईश्वेद समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी ‘अॅग्रोवन’ला दिली. जागतिक कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ईश्वेद बायोटेकच्या उच्च गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्याच्या वचनबद्धतेचा हा एक ठोस पुरावा आहे.

जागतिक अन्नसुरक्षेला पाठबळ देत शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवून, ही निर्यात शाश्वत शेतीकडे एक महत्त्वपूर्ण वाटचाल ठरेल, असे वायाळ यांनी या वेळी सांगितले. ग्रँड ग्रँड नाईन हे केळीचे वाण लवचिकता आणि उच्च उत्पादनक्षमतेसाठी ओळखले जाते. विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितींशी समायोजित होण्याची क्षमता अफ्रिकन शेतीसाठीही फायदेशीर ठरेल. या उच्च-कार्यक्षमतेच्या वनस्पती प्रकाराची आफ्रिकेत ओळख करून देण्याचे ईश्वेद बायोटेकचे प्रयत्न आहेत.

तेथील कृषी उत्पादन क्षमता वाढवणे आणि शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे आहे. शाश्वत शेती आणि सुधारित जीवनमानाच्या दिशेने जागतिक चळवळीत सहभागी होताना आम्हाला अभिमान वाटतो.

आमचे GGN केळीचे रोप केवळ शेतीतील नावीन्यपूर्णता दर्शवते असे नाही, तर जगभरातील शेतकऱ्यांसमवेतची आमची मजबूत भागीदारी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आमचे प्रयत्नही अधोरेखित करते. - संजय वायाळ, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, ईश्वेद समूह

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याचे बाजारभाव आणखी किती दिवस टिकतील? बाजारातील आवक कमीच

Cotton Pest Attack : कपाशीच्या पिकावर अळीचा हल्ला; पानांची चाळणी

Soybean Market : सोयाबीनची आवक राज्यातील बाजारांमध्ये शिगेला; भावामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची

Nanded Vidhansabha Election : नांदेडमध्ये लोकसभेसह विधानसभेसाठी २५ वर्षांनंतर मतदान

Sugarcane Crushing : गाळपासाठी नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांना परवाना

SCROLL FOR NEXT