Baramati News: अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शारदा महिला संघ यांच्यामार्फत शुक्रवारी (ता. ११) बारामतीत धान्य महोत्सव सुरू होत आहे. हा महोत्सव रविवारी (ता. १३) सुरू राहणार आहे.
दरवर्षी हा महोत्सव बाजार समितीच्या रयत भवनमध्ये होत होता. परंतु रयत भवन आता जमीनदोस्त झाले असल्याने यंदा हा महोत्सव तीन हत्ती चौकातील महावीर भवन येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यंदाचा हा दहावा महोत्सव आहे.
या महोत्सवात घरगुती वापरासाठी वर्षभर लागणारे गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य, डाळी, बाजरी, काजू, बदाम, हळद, मशरूम, भरडधान्य व त्याचे प्रक्रिया पदार्थ, दुधाचे प्रक्रिया पदार्थ इत्यादी शेतातून थेट आपल्यापर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदीची संधी नागरिकांना मिळते व त्याला प्रतिसाद देखील उत्तम असतो. तीन दिवस सकाळी नऊ ते रात्री साडेआठ या वेळेत हा महोत्सव खुला असेल.
महोत्सवात गहू (एचडी २१८९, लोकवन, खपली आणि त्र्यंबक) भोर, वेल्हा, जुन्नर, रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा (इंद्रायणी, रत्नागिरी २४ आणि काळा) तांदूळ, मालदांडी, दगडी, रेवती आणि वसुधा या जातीची ज्वारी, नाचणी, वरई, बाजरी, राळा, सावा इत्यादी भरडधान्ये तसेच मटकी, चवळी, हुलगा, तूर, डाळी, हरभरा अशी कडधान्ये तसेच घाण्याचे तेल, हापूस आंबा, अंजीर, बेदाणे, कोकम, निरा, मध, गूळ, चिंच, ओली हळद, विविध प्रकारचे मसाले, चटण्या, उन्हाळी पदार्थ आणि मातीची भांडी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत,
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धान्य महोत्सव पार पडेल. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.