Baramati Grain Festival : बारामती येथे ७ ते ९ एप्रिलदरम्यान धान्य महोत्सव

या वर्षीचा हा नववा धान्य महोत्सव असून, सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे.
Grain Festival
Grain FestivalAgrowon
Published on
Updated on

Baramati News : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित (ADT Baramati) कृषी विज्ञान केंद्र बारामती शारदा महिला संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती (Baramati APMC) यांच्या मार्फत रयत भवन येथे ७ ते ९ एप्रिलदरम्यान धान्य महोत्सवाचे (Grain Festival) आयोजन केले आहे. या वर्षीचा हा नववा धान्य महोत्सव असून, सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे.

घरगुती वापरासाठी वर्षभर लागणारे गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य, डाळी, बाजरी, काजू, बदाम, हळद, मशरूम, दुधाचे प्रक्रिया पदार्थ इत्यादी शेतातून थेट आपल्यापर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवात नागरिकांना मिळते व त्याला प्रतिसाददेखील उत्तम असतो.

Grain Festival
Ajit Pawar : ‘अधिवेशनात कोडगेपणाचा कळस पाहायला मिळाला’

गहू (एचडी २१ ८९, लोकवन, खपली आणि त्र्यंबक), तांदूळ- भोर, वेल्हा, जुन्नर, रत्नागिरी तालुक्यांतील शेतकऱ्यांचा (इंद्रायणी, रत्नागिरी २४ आणि काळा भात) ज्वारी-(मालदांडी दगडी, रेवती आणि वसुधा) भरडधान्य- (नाचणी, वरई तांदूळ बाजरी, राळा, सावा इ. व त्याचे प्रक्रिया पदार्थ)

Grain Festival
Ajit Pawar : "दुधाच्या धंद्यामुळे माझं बस्तान बसलं" - अजित पवार

या व्यतिरिक्त कडधान्य- (मटकी, चवळी, हुलगा, तूर डाळी, हरभरा) तसेच घाण्याचे तेल, देवगड हापूस आंबा, मनुके इ. एकाच छताखाली या सर्व जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

हा धान्य महोत्सव संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व विश्‍वस्त सुनंदा पवार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com