PM Surya Ghar Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Rooftop Solar Scheme : पुणे जिल्ह्यातील ३२ हजार घरकुलांवर होणार विजनिर्मिती

PM Awas Yojana : पुणे जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ३२ हजार घरकुलांमध्ये आता पंतप्रधान सूर्यघर योजनाही राबविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ३२ हजार घरकुलांमध्ये आता पंतप्रधान सूर्यघर योजनाही राबविण्यात येणार आहे. यासाठी १५ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींना मिळणार आहे, तसेच घराघरांत वीजनिर्मिती होणार होणार आहे.

पंतप्रधान आवास योजना टप्पा क्रमांक २ अंतर्गत पात्र लाभार्थीना घरकुले मंजूर झाली आहेत. जिल्ह्यात ३२ हजार तर दौंड तालुक्यात १ हजार ९०० घरकुले मंजूर झाली आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १५ हजारांचा पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोडण्यात आला.

दरम्यान घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या वीट, सिमेंट, दगड, वाळू, पत्रा, मजुरी यामध्ये वाढ झाल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी होती. या कार्यक्रमात घरकुलासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान राज्य शासनाच्या वतीने वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आली.

पूर्वी घरकुलासाठी १ लाख २० हजार अनुदान देण्यात येत होते. आता १ लाख ७० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रकही काढले आहे. वाढीव जाहीर केलेल्या ५० हजार रुपयांच्या अनुदानात शासनाने ३५ हजार रुपये बांधकामासाठी, तर १५ हजार सूर्यघर योजनेसाठी दिले आहेत.

देऊळगाव राजे व लिंगाळी (ता. दौंड) येथील निवड झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये भाग घ्यावा. घरावर सौर ऊर्जा यंत्रणा राबविल्यामुळे वीजबिलापासून कायमची मुक्ती मिळेल, असे ग्रामसेवक अमीर शेख यांनी सांगितले.

घरकुलासाठी मिळणारे अनुदान :

स्वच्छ भारत मिशनमधून नवीन शौचालय बांधणे : १२ हजार रुपये

रोजगार हमी योजना (मजुरी) : २६ हजार रुपये

प्रधानमंत्री सूर्यघर योजना : १५ हजार रुपये

बांधकामासाठी उपलब्ध होणारे अनुदान : १ लाख ५५ हजार रुपये

(जुने १ लाख २० हजार रुपये व वाढीव ३५ हजार)

सूर्यघर योजनेसाठी एकूण ४५ हजार रुपयांचे अनुदान :

पंतप्रधान सूर्यघर योजनेसाठी सौर ऊर्जेला चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थ्यास ३० हजार रुपयांचे अनुदान मिळते. परंतु घरकुल लाभार्थींनी ही योजना घरावर राबविल्यास त्यांना केंद्र व राज्य सरकाराचे असे एकूण ४५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: यापुढे चुकीला माफी नाही

Lumpy Disease Issue: लम्पीने अहिल्यानगरला १४, मोहोळमध्ये दोन पशुधन दगावले

Malin Village : पुनर्वसन झाले, मात्र गावचे गावपण हरपले

Banana Export Workshop: निर्यातक्षम केळीबाबत वसईत शनिवारी परिसंवाद

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT