Surya Ghar Scheme : सोलापुरात सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण

Surya Ghar Free Electricity Scheme : राज्य सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात पंरप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ८२ दिवसांत पूर्ण केले.
Rooftop Solar Scheme
PM Surya Ghar Yojana Agrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात पंरप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ८२ दिवसांत पूर्ण केले.

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची एकूण संख्या ७१,४३७ होती व त्यांची एकूण क्षमता २८३ मेगावॅट होती. शंभर दिवसांच्या मोहिमेत एकूण घरांची संख्या १.२५ लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.

Rooftop Solar Scheme
PM Surya Ghar Scheme : ‘पीएम-सूर्यघर’अंतर्गत एक कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज

राज्यात २६ फेब्रुवारी रोजी योजनेच्या लाभार्थी घरांची संख्या १,२८,४७० व एकूण क्षमता ५०० मेगावॅट झाली होती. या योजनेचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण झाले. या आधी महावितरणने मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट साठ दिवसांत पूर्ण केले आहे.

सोलापुरातील ४ हजार कुटुंब लाभार्थी
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या २१,०२७ झाली आहे. नागपूरनंतर पुणे (९८७५ घरे), जळगाव (९४८९ घरे), छत्रपती संभाजीनगर (८८१४ घरे), नाशिक (८५५८ घरे), अमरावती (७११९ घरे), कोल्हापूर (६२९१ घरे), धुळे (४१८७ घरे) आणि सोलापूर (४००७ घरे) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com