Anganwadi Sevika  Agrowon
ॲग्रो विशेष

Anganwadi Relocation : अंगणवाड्यांचे होणार ‘जिल्हा परिषदे’त स्थलांतर

Maharashtra Anganwadi Policy : राज्यातील महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांना स्थिर सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांना स्थिर सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना जवळच्या जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त वर्गखोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणास शासनाने मान्यता दिली आहे.

अंगणवाड्यांना शासकीय इमारतीमध्ये स्थलांतर केल्याने बालकांचे शिक्षण परिणामकारकपणे होणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यात एकूण ९८ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.

एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात ५५३ बालविकास प्रकल्प आहेत. त्यात १०४ नागरी, तर ४४९ ग्रामीण प्रकल्पांचा समावेश आहे. त्याअंतर्गत १ लाख १० हजार ६६९ अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत.

२४ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

स्थलांतर धोरणातील अटी

अंगणवाडी व शाळा यांमधील अंतर एक किलोमीटरच्या आत असावे

बहुमजली शाळा इमारतीत तळमजल्यावरील खोली अंगणवाडीला द्यावी

अंगणवाडीला शाळेचे स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, क्रीडांगण, पिण्याचे पाणी व क्रीडा साहित्य वापरण्याची मुभा असेल

शाळेमध्ये वीज उपलब्ध नसेल, तर ती शाळेमार्फत अंगणवाडीला उपलब्ध करून द्यावी

किरकोळ दुरुस्ती, अंतर्गत सजावट आणि बालकांनुसार आवश्यक व्यवस्था महिला व बालविकास विभाग करणार

जिल्ह्यात १८ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही, आता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या अंगणवाडीजवळच्या जिल्हा परिषदेत स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू केली आहे. हा निर्णय बालकांच्या शैक्षणिक आणि पोषणात्मक विकासासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरणार आहे.
- जामर्सिंग गिरासे, महिला व बालविकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway : कोल्हापुरात एक टक्काही शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन नाही

Lumpy Skin Disease : विळखा घातक ‘लम्पी’चा!

Ujani Dam Water Release : 'उजनी'तून 'भीमे'त २० हजाराचा विसर्ग

Plastic Flower Ban : प्लॅस्टिक फूल विक्रीवर शासनाने बंदी घालावी

Urea Shortage : युरीया बनला विक्रेत्यांचीही डोकेदुखी

SCROLL FOR NEXT