Anganwadi Center : विक्रमगडमध्ये खासगी इमारतीत ७८ अंगणवाड्या

Rural Education : विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी सरकारने बाल विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडोपाड्यात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरू केली आहेत.
Panchayat Samiti Vikramgad
AnganwadiAgrowon
Published on
Updated on

Palghar News : विक्रमगड तालुक्यातील २९९ अंगणवाडी केंद्रे व मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी सरकारने बाल विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडोपाड्यात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरू केली आहेत व नवीन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

परंतु, विक्रमगड तालुक्यातील ७८ अंगणवाड्यांना स्वत:च्या शासकीय इमारतीमध्ये जागा नसल्याने त्या आजही खासगी इमारतीत समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी, प्राथमिक शाळेच्या खोलीत भरविल्या जात आहेत. अगोदरच सरकारकडून या केंद्रांना पाहिजे तशा सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. त्यात स्वतःची इमारत नसल्याने अनेक अडचणी समोर येत आहेत.

Panchayat Samiti Vikramgad
Anganwadi Fund : जळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा ६ कोटींवर निधी परत

विक्रमगड तालुक्यातील अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यासाठी पैसा खर्च करीत आहेत. तालुक्यातील २९९ अंगणवाडी केंद्रांमधील २२१ केंद्रांना स्वतःची इमारत असली तरीही ७८ अंगणवाड्या या खासगी किंवा समाजमंदिरात भरविल्या जातात. ही केंद्रे शासनाची स्वतःची इमारत नसल्याने जागेअभावी अनेक सुविधांविना आजही चालविल्या जात आहेत.

Panchayat Samiti Vikramgad
Anganwadi School : नक्षलग्रस्त भागातील १५ अंगणवाड्या जीर्ण

अंगणवाडी पदभरती प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यात अंगणवाडी सहा सेविका पदांसाठी आणि ७१ मदतनीस पदांसाठी रिक्त पदे उपलब्ध आहेत. तालक्यात मंजूर सेविका पदे २९९ इतकी असून, कार्यरत सेविका २९२ आहेत.

अंगणवाडी केंद्रे माहिती पट

अंगणवाडी केंद्रे २९९

कार्यान्वित अंगणवाडी केंद्रे २९९

स्वत:ची इमारत असलेली केंद्रे २२१

खासगी इमारतीत असलेली केंद्रे ४५

प्राथमिक शाळेतील केंद्रे १२

समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणची केंद्रे २१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com