Milk Rate Strike  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूधप्रश्नी अकोलेतील बेमुदत उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष

Hunger Strike for Milk Rate : दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी गेल्या ४ दिवसांपासून दूध उत्पादक अकोले येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत.

Team Agrowon

Nagar News : दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी गेल्या ४ दिवसांपासून दूध उत्पादक अकोले येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. सरकारने ४ दिवस उलटूनही उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी सुरू केलेल्या या उपोषणात बेमुदत अन्नत्याग करत डॉ. अजित नवले यांनी भाग घेतला आहे.

दुधाचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने आदेश देऊनही सहकारी व खासगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास सह्याद्री अतिथिगृहात नुकत्याच झालेल्या बैठकीत नकार दिला आहे. अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने तातडीने या प्रश्नी ठोस तोडगा काढावा, असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे.

मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालुंजकर, सुनील लोखंडे, नितीन डुंबरे, नीलेश गवांदे, दीपक पथवे, संदीप शेणकर, राहुल शेटे, किशोर शिंदे, सत्यम भोर, अतुल लोहटे, संतोष भोर, राजेंद्र भोर, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ आदी दूध उत्पादक आंदोलनाचे संचालन करीत आहेत.

उपोषणास शेकडो ग्रामपंचायती व दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलन स्थळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार व खासदारांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. दुधाला ३४ रुपये भाव, दूध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटामारी, खासगी संस्थांना लागू असणारा कायदा आदीप्रश्नी कार्यवाही केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Karjmafi: वेळकाढूपणाचे प्रयोग

Farmer Loan Waiver: हातावर देऊन कोपरावर नका मारू

Vice Chancellor Post: कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी चौकशीचे कुभांड

Agricultural Officers Issue : सहायक कृषी अधिकारी संघटनेचा सिम कार्ड स्वीकारण्यास नकार

Sugarcane Rate Protest: कोल्हापुरात अनेक ठिकाणी ऊसतोडणी रोखण्याचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT