Shivrajsingh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market Rate : सोयाबीनला सरकार हमीभाव मिळवून देणार; कृषिमंत्र्यांनी सांगितले तीन पर्याय

Shivrajsingh Chauhan on Soybean MSP : सरकार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव देणार आहे. त्यासाठी सरकार तीन पर्यायांवर काम करत आहे.

Anil Jadhao 

Pune News : सरकार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव देणार आहे. त्यासाठी सरकार तीन पर्यायांवर काम करत आहे. सरकार एकतर हमीभावाने सोयाबीनची खरेदी करेल. किंवा सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवेल किंवा खासगी खरेदीदारांना सोयाबीन खरेदीसाठी १५ टक्के निधी देईल, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. 

परळी येथील कृषी महात्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी ही माहीती दिली. देशातील बाजारात सध्या सोयाबीनचा भाव पडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्याचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावावर आला. याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरही होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव ४ हजारांच्या पातळीवर देखील आला. सध्या ४ हजारांपेक्षा कमी भाव सोयाबीनला मिळत आहे.

सोयाबीनचा भाव दबावात असल्याने सरकारने हमीभावाने खरेदी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीचा हाच धागा पकडत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सरकार सोयाबीनला हमीभाव देईल, याची घोषणा केली. सोयाबीनला किमान हमीभाव मिळावा यासाठी सरकार तीन पर्यायांवर विचार करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

हमीभावाने खरेदी

शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सरकार खरेदीत उतरेल, असे चौहान यांनी सांगितले. यंदा सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला. सरकारने सोयाबीनची खरेदी सुरु केल्यास खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आणि सोयाबीनला हमीभाव मिळेल. 

भावांतर योजना

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी भावांतर योजनेचाही विचार करत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन बाजारात कमी भाव मिळाला तर सरकार हमीभाव आणि शेतकऱ्यांना बाजारात मिळालेला भाव यातील फरक देईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

खासगी खरेदीदारांना मदत

शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सरकार आणखी एका पर्यायावर विचार करत असून या पर्यायानुसार बाजारात खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांना हमीभावाने शेतीमाल खेरदीचे बंधन घालण्यात येईल. सरकार या खेरदीदारांना सोयाबीन खरेदीसाठी १५ टक्के मदत करेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT