Agriculture Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : कृषी महोत्सवात ‘कृषी’सह शासकीय स्टॉल फक्त शोभेपुरते

Organization of Agriculture and Tejaswini Mahotsav : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला विकास आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान येथे डोंगरे मैदानावर कृषी व तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nashik News : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला विकास आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान येथे डोंगरे मैदानावर कृषी व तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी विषयक विविध स्टॉलसह, शेतमाल विक्रीची स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. असे असताना शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने गर्दी कमी आहे.

अनेक शासकीय स्टॉल कर्मचारी व अधिकाऱ्यांविना मोकळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषी महोत्सवात ‘कृषी’सह शासकीय स्टॉल फक्त शोभेपुरते उभे असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात शेतकरी व भेट देणाऱ्यांना भेट देऊन फायदा काय, असा प्रश्न आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागासह विविध शासकीय विभागाचे स्टॉल येथे आहेत. शेतकऱ्यांना नवीन संकल्पना,तंत्रज्ञान व योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रदर्शनामध्ये शासनाचा सहभाग असतो. असे असताना फक्त महोत्सव दिखाव्यापुरता उरला की काय, असा प्रश्न भेट देणाऱ्यांना पडतो आहे.

शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. मात्र कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)चे क्षेत्रीय कर्मचारी आयोजनात सक्रिय दिसून आले. कृषी विभागाच्या स्टॉलवर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना यांचा उल्लेख आहे. मात्र माहिती देणार कोण, असा प्रश्न भेट देणाऱ्याला पडतो.

स्टॉलवर शुकशुकाट

रविवारी (ता.११) व सोमवारी(ता.१२) हे दोन दिवस सलग सायंकाळी स्टॉलवर कुणीच नसल्याने निर्मनुष्य दिसून आले. भेट देणारे या दालनात गेल्यानंतर शासकीय प्रतिनिधी आहेत का, अशी चौकशी करतात. मात्र येथे कुणीच नसल्याने त्यांना साधा प्रतिसाद मिळत नाही.

यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग, महाबीज, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण, रेशीम कार्यालय, भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणा या स्टॉलवर कुणीच नसल्याने ते निर्मनुष्य होते. दुसरीकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र-नाशिक, कृषी विज्ञान केंद्र-मालेगाव व कृषी संशोधन केंद्र-निफाड यांसह महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ या स्टॉलवर सायंकाळपर्यंत कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millets Board : राष्ट्रीय भरडधान्य मंडळ स्थापन करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत उत्तर

Pimpalgaon APMC Controversy: अजितदादांचा आणखी एक शिलेदार अडचणीत; ६२ कोटींच्या बांधकाम निवदांवरून वाद

Organic Farming Success : प्रतिकूलतेतही नगदी पिकांचे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन

Sugarcane Nutrient Management: आडसाली उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

SCROLL FOR NEXT