Tur Crop : किड रोग, कमी पाऊस आणि उष्णतेमुळे तूरीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून तूर आणि उडीद डाळीचे भाव अजूनही चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. मात्र, केंद्र सरकार आता तूर आणि उडीद डाळींचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असून या डाळींचा साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. ही सुधारित मर्यादा तात्काळ लागू करण्यात आल्याने डाळींचे भाव कमी शक्यता व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये डाळींच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा निर्माण झाल्याने डाळीचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे सरकारने परदेशातून डाळींचे आयात करण्याचा निर्णय केला. ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, वर्षाच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत तुरीची बाजारात किंमत ४५ टक्क्यांनी वाढून १६० रुपये प्रति किलो झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी किरकोळ विक्रीचा दर १७० रुपये किलोवर पोहोचला आहे. उडीद डाळीची किरकोळ बाजारात किंमत ११० रुपये प्रति किलोवर गेली आहे. ती सहा महिन्यांपूर्वीच्या किमतीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढली आहे.
सरकारने तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याची मर्यादा वाढवली आहे. ही सुधारित मर्यादा तात्काळ लागू करण्यात आली आहे. यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी तूर आणि उडीद डाळ ठेवण्याची मर्यादा कमी करण्यात आली होती. ती स्टॉक मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता घाऊक व्यापाऱ्यांना प्रत्येक डाळीचा २०० मेट्रिक टन साठा ठेवण्याची परवानगी दिली आहे. मोठे साखळी विक्रेते प्रत्येक आउटलेटवर ५ MT आणि वेअरहाऊसमध्ये २०० MT ठेवू शकतात. मिलर्स गेल्या ३ महिन्यांतील उत्पादन किंवा वार्षिक क्षमतेच्या २५ % ठेऊ शकतात. कस्टम क्लिअरन्सनंतर आयातदार दोन्ही डाळींचा साठा ६० दिवसांपर्यंत ठेवू शकतील. किरकोळ विक्रेत्यांना दोन्ही डाळींचा ५ MT साठा ठेवण्याची परवानगी असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.