Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : ‘दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही’

Maharashtra Drought : सरकारमधून आधी बाहेर पडावे, भविष्यात आमच्या सोबत यावे, मिळून संघर्ष करू, असे आवाहन शेट्टी यांनी केलं.

Team Agrowon

Solapur : राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. पण हे वास्तव माहीत असूनही सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेळ नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.११) येथे सरकारच्या कारभारावर टीप्पणी केली.

श्री. शेट्टी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यंदाच्या गाळप हंगामात कारखान्यांनी अतिरिक्त ४०० रुपये जादा एफआरपी दिली नाही तर, आम्ही कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कारखान्यांनी गेल्या हंगामात इथेनॉलमधून भरमसाठ कमाई केली आहे. सोलापूरसह राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे.

त्यांना गाळप परवाना देऊ नका अशी मागणी साखर आयुक्तालयांकडे करणार आहोत, तसेच वाहन खरेदी करताना वाहनधारकांना भरमसाठ टॅक्स भरावा लागतो. डिझेलचा भाव पाहिला असता, ९५ रुपयांच्या आसपास आहे. हे सरकार डिझेल ३५ रुपयांपर्यंत देऊ शकतं, पण त्याच्यावर मोठा कर आकारून ९५ रुपयांपर्यंत विक्री केली जात आहेत. तसेच रस्त्यांवर किती खर्च झाला आणि टोल नाक्यांमधून किती उत्पन्न मिळाले याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी केली.

काही दिवसांपूर्वी बच्चू कडू हे सोलापुरात आले होते. त्यांनी शेतकरी प्रश्नांवर बोलताना असे सांगितले की, दुष्काळ जाहीर करण्याऐवजी शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी, यावर राजू शेट्टींनी बच्चू कडूंना प्रतिउत्तर दिले. त्यांनी सरकारमधून आधी बाहेर पडावे, भविष्यात आमच्या सोबत यावे, मिळून संघर्ष करू, असे आवाहन शेट्टी यांनी केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT