Drought condition : निम्म्या मराठवाड्याची हंगामी पैसेवारी ५० च्या आत

Marathwada Paisewari : मराठवाड्यातील ८४९६ गावांपैकी ४५८४ गावांची खरीप हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे.
Drought condition
Drought conditionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati sambhaji Nagar News : मराठवाड्यातील ८४९६ गावांपैकी ४५८४ गावांची खरीप हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे दुसरीकडे ३९१२ गावातील पैसेवारी ही ५० पैशांच्या पुढे आली आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांचे आता सवलती, दुष्काळी निधी आणि नुकसानीच्या मदतीकडे लक्ष लागले आहे

Drought condition
Koyna Dam Rain : कोयना धरण नव्वदी पार तर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची अशी आहे स्थिती, उद्यापर्यंत पाऊस राहणार

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५०१ गावांत ५६ लाख ७ हजार ७१ हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. त्यापैकी ५० लाख ९५ हजार ९५० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची आहे. त्या खालोखाल कपाशी आहे. यंदा खरिपावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडांनी मराठवाड्यातील सोयाबीनसह कपाशी या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे यंदाचा खरीप शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही टाकेल, अशी आशा आता राहिलेली नाही. दुसरीकडे पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे रब्बीवरही मोठे संकट आहे. रब्बीतील पेरण्या होतील की नाही, याविषयी शंका आहे. परतीच्या पावसाने काही भागांत पाणीसाठा वाढविण्यास मदत केली असली तरी ती पुरेशी नाही. जायकवाडीसारखा मोठा प्रकल्प अजूनही उपयुक्त पाणीसाठ्यात ५० टक्क्यांच्या आतच आहे.

Drought condition
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, जलाशय पूर्ण क्षमतेने भरणे कठीण

पैसेवारीचा थेट संबंध पूर्वी दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगाने यायचा. परंतु ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाने पैसेवारीचे महत्त्व नेमके किती हे अधोरेखित झाले आहे. सुधारित खरीप पैसेवारी ३० ऑक्टोबरला व अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर होईल. त्यामुळे पावसाच्या खंडांनी मोठे नुकसान केलेले असताना विमा कंपन्या, शासन शेतकऱ्यांना काय आधार देणार, याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

५० च्या आतील पैसेवारीची जिल्हानिहाय गावे

छत्रपती संभाजीनगर---१३५६,

धाराशिव---४०७

बीडमधील---१०९६,

लातूरमधील---९५२

पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र पडीक

मराठवाड्यातील एकूण लागवडीलायक ५६ लाख ७ हजार ७१ हेक्टर क्षेत्रापैकी चार लाख ७२ हजार ५८४ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५१ हजार ८९२ हेक्टर, धाराशिवमधील १ लाख ४४ हजार ९४१ हेक्टर, परभणीतील ३७ हजार ६४१ हेक्टर, नांदेडमधील ७२ हजार ८३२ हेक्टर, जालन्यातील २५ हजार ५८१ हेक्टर, लातूरमधील २६ हजार ९१४ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यातील २८ हजार १४२ क्षेत्राचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com