Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Update : सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंत कायदा पारित करावा. अन्यथा सरकारची खैर नाही.

Team Agrowon

Hingoli News : महाराष्ट्रातील मराठा व कुणबी एकच आहेत. त्यामुळे सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंत कायदा पारित करावा. अन्यथा सरकारची खैर नाही. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी डिग्रस कऱ्हाळे फाटा (ता. हिंगोली) येथे गुरुवारी (ता. ७) जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. जरांगे पाटील म्हणाले,

की मराठा आरक्षणाचा संघर्ष अनेक दशकांपासून सुरू आहे. परंतु आरक्षण दिले तर मराठा समाज मोठा होईल, मराठ्यांना मोठ होऊ द्यायचे नाही, त्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे आहेत.

गुन्हे मागे का घेतले नाहीत याचे सरकारने उत्तर दिले पाहिजे. आमच्या विरोधात डाव रचू नका. मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल. महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल. नोंदी शोधाव्यात आणि नोंदी सापडलेल्या ३५ लाख मराठा समाजाला आरक्षण मिळाले.

त्यामुळे अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकाचवेळी न्याय पाहिजे, अशी संधी पुन्हा येणार नाही. राजकीय मतभेद सोडा. एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. छगन भुजबळ यांचे ऐकून कुणी मराठ्यांवर अन्याय केला तर त्यांचे राज्यात फिरणे मुश्कील होईल.

कायदा पायदळी तुडवणाऱ्या भुजबळ यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये. गावखेड्यात मराठा व ओबीसी समाज बांधवांचे एकमेकांवर प्रेम आहे. भुजबळ यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे, त्यामुळे त्यांचे ऐकू नये असेही जरांगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: उद्योगाचा गाडा रुळावर आणा

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ ९९.२८ टक्क्यांवर

ISO Certification: महावितरणच्या सहा कार्यालयांना एका वेळी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

Youth Empowerment: राज्यात ७५ हजार युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

SCROLL FOR NEXT