Traditional Fisherman Agrowon
ॲग्रो विशेष

Fisheries Department : पारंपरिक मच्छीमारांवरील नोटिसा मागे घेणार

Traditional Fisherman : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दालदा (गीलनेट) पद्धतीने मासेमारी करण्याऱ्या पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

Team Agrowon

Bhayanadar News : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दालदा (गीलनेट) पद्धतीने मासेमारी करण्याऱ्या पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

या नोटिसांसदर्भात मच्छीमारांनी राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एकाही मासेमारी नौकेचे नूतनीकरण थांबणार नाही अथवा डिझेल परतावा रोखणार नाही, असे आश्वासनही राणे यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले.

समुद्रात चालणाऱ्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे, परंतु त्याचा फटका पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या अधिकृत मच्छीमारांनाही बसू लागला आहे.

मासेमारी नौकेला कलर कोड नसणे, नौकेवर क्रमांक नसणे, तसेच जाळी ओढण्यासाठी बूम (विंच)चा वापर करणे आदी मुद्द्यांवर मच्छीमारांना नोटिसा बजावण्यात येऊ लागल्याने तीव्र नाराजी होती.

यासंदर्भात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, महिला अध्यक्षा नयना पाटील, युवा अध्यक्ष मिल्टन सोदिया, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष माल्कम कासुघर, ठाणे जिल्हा सचिव माल्कम भंडारी, उत्तन वाहतूक सहकारी संस्थेचे बोना मालू, विल्सन बांड्या यांनी राणे यांची भेट घेतली.

कायद्यात उल्लेख नसल्याची सबब

पर्ससीन मासेमारी नौका एकाच फेरीत प्रचंड प्रमाणात मासे पकडत असल्याने त्यांना जाळी ओढण्यासाठी हायड्रॉलिक बूम बसविणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र पारंपरिक मच्छीमारांना बूम वापरण्याची बंदी असल्याचे कायद्यात कुठेही उल्लेख नसल्याचे शिष्टमंडळाने राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मच्छीमारांना बजावण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश राणे यांनी दिल्याची माहिती बर्नड डिमेलो यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT