Farmer ID  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

Agristack Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ जलद आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ॲग्रिस्टॅक’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Washim News : केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ जलद आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ॲग्रिस्टॅक’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन माहिती, आधार संलग्न माहिती आणि भू-संदर्भीय माहिती शेतकरी ओळख क्रमांकासोबत जोडली जाणार आहे.

हा क्रमांक नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, पीकविमा योजना, बाजारपेठ माहिती, तसेच किमान आधारभूत किमतीवर खरेदीसाठी नोंदणी सहज आणि सोपी होईल.

तसेच, शेतजमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहिल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळू शकेल.

वाशीम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सामाईक सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक आणि ७/१२, ८-अ उतारा घेऊन जावे.

शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार केल्यास पीककर्ज, पीकविमा, किमान आधारभूत किंमत खरेदी, तसेच विविध योजनांचा लाभ सहज मिळू शकेल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्वरित CSC केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी.
- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT