Farmer ID : शेतकरी कार्डावर होतेय लागवडीखालील जमिनीचीच नोंद

Cultivable Land : शेतकऱ्यांना आयडी कार्ड देण्यासाठी केंद्र शासनाने ‘फार्मर आयडी’ ही संकल्पना पुढे आणली आहे. आधार कार्डच्या धर्तीवर हे ‘फार्मर आयडी’ कार्ड काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Akola News : सध्या शेतकरी कार्ड तयार करण्यासाठी नोंदणीची मोहीम सुरू आहे. या प्रक्रियेत सात-बारावर असलेले लागवडीखालील क्षेत्रच दिसत असल्याने त्या नोंदणी ॲपमध्ये दुरुस्ती करून पोटखराब क्षेत्राचीही नोंद व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

शेतकऱ्यांना आयडी कार्ड देण्यासाठी केंद्र शासनाने ‘फार्मर आयडी’ ही संकल्पना पुढे आणली आहे. आधार कार्डच्या धर्तीवर हे ‘फार्मर आयडी’ कार्ड काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत.

Agriculture Land
Farmer ID : ‘ॲग्रीस्टॅक’अंतर्गत दीड लाख शेतकरी आयडी तयार

त्यानुसार महसूल प्रशासनाकडून ॲग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत गावागावांत बैठका घेत शेतकरी कार्ड काढण्यात येत आहे. या कार्डमुळे आपली एकूण जमीन किती, शेतात कुठले पीक घेतले, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ, बँकेकडून पीककर्ज घेणे, त्याच प्रमाणे कृषी क्षेत्रातील लाभ घेणे व शेती संबंधित सर्व माहिती या कार्डचा नंबर (आयडी) वापरल्यावर दिसणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत तसेच कामकाजात पारदर्शकता येईल, असा दावा केला जात आहे. दुसरीकडे मात्र फार्मर आयडी काढताना गट नंबर दाखल केल्यानंतर सात-बारा, नमुना आठवरील पोटखराब क्षेत्र दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Agriculture Land
Farmer ID : सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांमध्ये ‘फार्मर आयडी’वरून संभ्रम

दुरुस्तीला वाव दिसत नाही

शेतकऱ्याने माहितीची नोंदणी केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करता येत नसल्याने पोट खराब क्षेत्र कमी दिसल्यास शेतकऱ्यांचे सात-बारावरील क्षेत्र आणि या फार्मर आयडीमधील लागवडीखालील क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यामध्ये तफावत निर्माण होणार आहे. भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे शेतकरी बोलत आहेत.

शेतकरी कार्डासाठी नोंदणी करताना एकूण सात-बारावरील लागवडीखालील क्षेत्रच दिसत असल्याने या ऑनलाइन प्रणालीमध्ये दुरुस्ती केली जावी. त्यात शेतकऱ्याचे पोटखराब क्षेत्राचीही नोंद झाली पाहिजे. यासाठी आपण तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणीही केली आहे.
-विनायक सरनाईक, शेतकरी नेते, चिखली, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com