Ration Card Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Holders : सत्तावीस हजार रेशनधारक कुटुंबांसाठी ‘गुडन्यूज’

Integrated and Sustainable Textile Policy : राज्य सरकारने २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे.

हेमंत पवार

Karad News : राज्य सरकारने २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रतिकुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील २७ हजार सात लाभार्थ्यांना या साड्यांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे.

अशी केली जाईल कार्यवाही

साड्यांच्या वाटपासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. ती एक साडी सरकार महामंडळाकडून ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे.

या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रीयन सणाला मिळणार साडी

शासनाने चैत्रपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देण्याची मोहीम हाती घेतली. आता राज्य सरकारकडून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दर वर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार आहे. त्यानुसार राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार असून राज्यातील २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल.

ई-पॉस मशिनवरच होणार वाटप

जे शिधापत्रिकाधारक अंत्योदय योजनेत समाविष्ट झाले आहे, त्यांना साडीचे पुरवठा विभागाकडून वितरण करण्यात येणार आहे. या योजनेतील धान्याचे वाटप हे ई-पॉस मशिनद्वारे करण्यात येते.

त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता येत आहे. त्याचा विचार करून साड्यांचेही वाटप पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी त्यांचे वाटपही आता ई-पॉस मशिनवरच करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तालुक्याचे नाव लाभार्थ्यांची संख्या

सातारा १८३३

कोरेगाव १३११

कऱ्हाड ६३३४

खटाव २४४४

पाटण ३०८४

माण २९००

फलटण ४१२५

खंडाळा ११६९

वाई १५१०

महाबळेश्वर ५७९

जावळी १७१८

एकूण २७००७

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत साडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांच्या वाटपासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून निवड करण्यात असून त्यांच्याकडून पुरवठा विभागाला साड्या देण्यात येतील. वाटप रेशनधान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांनी ई-पॉस मशिनवर करण्यात येईल.
महादेव अष्टेकर पुरवठा अधिकारी, कऱ्हाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT