Gold Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Gold Price: सोन्याच्या किंमतीत वाढ; सोने पोहचले ६० हजारावर

अमेरिकन बँकिंग क्षेत्रातील घडामोडीमुळे भारतीय सोने बाजाराने उसळी घेतली आहे. तसेच जागतिक बाजारातील अनिश्चितेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे.

Team Agrowon

Gold Price : देशातील प्रमुख शहरात सोमवारी सोन्याने (ता.२०) उच्चांकी ६० हजार रुपये प्रतितोळाचा टप्पा गाठला होता. पण बुधवारी (ता.२२) मात्र सोन्याच्या किंमती १ हजार रुपयांनी कमी झाल्या. 

२२ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट होऊन किंमत ५९ हजार १९० तर २२ कॅरेटची किंमत ५४ हजार २२० रुपयांवर आल्या.

परंतू मुंबईमध्ये मात्र सोन्याची किंमत प्रतितोळा ६० हजार होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीत वाढ होत असते.    

अमेरिकन बँकिंग क्षेत्रातील घडामोडीमुळे भारतीय सोने बाजाराने उसळी घेतली आहे. तसेच जागतिक बाजारातील अनिश्चितेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे.

पुढील काही महिन्यात किंमत पातळीत चढ-उताराची अपेक्षाही अभ्यासक व्यक्त करत आहेत.

सध्या ग्रामीण भागात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

तसेच ग्रामीण भागात गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते.

दरम्यान, जागतिक पातळीवर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक डबघाईत आल्याचे वृत्त पसरले.

या वृत्तानंतर सोन्याच्या दरात ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तर निफ्टी व सेन्सेक्सदेखील ३ टक्क्यांनी खाली आले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming Maharashtra : हवामान बदल, नवीन वाण, देशांतर्गत बाजारपेठ आणि द्राक्ष निर्यातीवर मंथन

Rainfall Update : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची हजेरी

Satara Water Crisis : माण, खटावच्या ४२ गावांत टँकरने पाणी

Pomegranate Farming : जेऊर कुंभारीतील डाळिंब शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Election Commission Row: ज्ञानेश कुमारांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा अन्यथा देशव्यापी आंदोलन, 'सीजेपी'चा इशारा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT